ज्योतिबा डोंगरावर कार्तिक पौर्णिमा पालखी सोहळा साजरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

paschim maharashtra

ज्योतिबा डोंगरावर कार्तिक पौर्णिमा पालखी सोहळा साजरा

ज्योतिबा डोंगर : येथे आजच कार्तिक पौर्णिमाचा सोहळा भक्तीमय वातावरणात झाला. पालखी सोहळ्यासाठी आजची पौर्णिमा अनुकूल असल्यामुळे रात्रीच मंदिरात पालखी सोहळा व दीपोत्सव साजरा करण्यात आला. हा नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली. आज दुपारी बारानंतर पौर्णिमा सुरू झाली आणि भाविकांची पावले जोतिबा डोंगराच्या दिशेने वळलीत .

ज्योतिबा डोंगरावर कार्तिक पौर्णिमेस मोठे पारंपरिक महत्त्व असल्याने या पौर्णिमेस भाविक आवर्जून येतात. तसेच येथून पुढे होणार्‍या पौर्णिमा महत्त्वपूर्ण मानल्या जातात. त्यामुळे भाविकांनी आजची पौर्णिमा धरली. जोतिबाच्या नावानं चांगभलं.. चोपडाई, यमाई , काळभैरवाच्या नावान चांगभलं च्या जयघोषात मंदिर परिसर भाविकांनी फुलून गेला. ठाकरे मिटके गल्लीत दर्शन रांग दिवसभर फुल्ल होती. उन्हात थांबून भाविकांनी श्रींचे दर्शन घेतले. आज मंदिरात केदार स्तोत्र केदार महिमा या विधींचे मंगल पठण झाले तसेच कार्तिक स्नान अभिषेक सोहळा झाला. आज रात्री ज्योतिबा मंदिर, महादेव चोपडाई ,काळभैरव ,यमाई येथील मंदिरावर शिखरे (पाजण्याचा) प्रज्वलित करण्याचा सोहळा झाला. हा दिपोत्सव पाण्यासाठी भाविकांनी गर्दी केली.

हेही वाचा: ज्योतिबा डोंगरावर डोंगर-दऱ्याला आली जाग; नागवेली पानातील महापूजा

महिन्याभरापासून सुरू असलेल्या कार्तीक स्नानाची सांगता आज झाली .कार्तिक पौर्णिमेचे महत्व. कार्तिक पौर्णिमेस डोंगरावर मोठे महत्त्व आहे .इथून पुढे होणाऱ्या पाच पौर्णिमा महत्त्वपूर्ण मानल्या जातात. या पौर्णिमेस भाविक नवस बोलून खेटे घालतात. येणाऱ्या पाचव्या पौर्णिमेस जोतिबाची चैत्र यात्रा असते. म्हणून ही कार्तिक पौर्णिमा डोंगरावर महत्त्वाची आहे .

loading image
go to top