esakal | Sakal - Read Latest Breaking Marathi News from Maharashtra India & Around the World
sakal

बोलून बातमी शोधा

Kolhapur

ज्योतिबा डोंगरावर डोंगर-दऱ्याला आली जाग; नागवेली पानातील महापूजा

sakal_logo
By
निवास मोटे

ज्योतिबा डोंगर : येथील श्री ज्योतिर्लिंग मंदिरात आज मंगलमय वातावरणात शारदीय नवरात्र उत्सवास प्रारंभ झाला. वाद्यांच्या निनादात मुख्य मंदिरात सकाळी घटस्थापनेचा विधी झाला. सकाळी आठ वाजता समस्त दहा गावकऱ्यांनी श्री ज्योतिबा (Jyotiba) देवाची बैठक सालंकृत पूजा बांधली. ही पूजा नागवेलीच्या पानांनी सजवली होती.

सकाळी साडेदहा वाजता घटस्थापनेचा विधी झाल्यानंतर यमाईदेवी तुकाई भावकाई मंदिरात घटस्थापना विधीसाठी पुजारी ग्रामस्थ देवसेवक देवस्थान समितीचे कर्मचारी अधीक्षक महादेव दिंडे गेले. पहाटे दोनपासूनच ईस पास काढून भाविक हजर होते. दर्शनाचा पहिला लाभ सांगली जिल्ह्यातील धनंजय उदय सांळुखे यांना मिळाला. त्यांचा तहसीलदार रमेश शेंडगे व देवस्थान समितीचे जोतिबाचे व्यवस्थापक महादेव दिंडे यांच्या हस्ते सत्कार झाला. दुपारी बाराला धुपारती सोहळा झाला. आरती मुख्य मंदिरात जाताना प्रवीण डबाणे यांनी तोफेची सलामी दिली.

हेही वाचा: 'सुखकर्ता, दु:खहर्ता‘ आरती सर्वप्रथम का म्हटली जाते?

कोडोलीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दिनेश काशीद यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त तैनात होता. एसटी महामंडळाने बसची सोय केली होती. मंदिर सुरु झाल्याने दिवसभर भाविकांची वर्दळ होती. प्रशासनाच्या वतीने प्रांताधिकारी अमित माळी, तहसीलदार रमेश शेंडगे लक्ष ठेवून आहेत.

हेही वाचा: पालघरमध्ये देवीचा जागर दर्शनासाठी महिला वर्गाची गर्दी

मंगळवारी जागर सोहळा

देवाचा जागर सोहळा मंगळवारी (ता. १२) होत असून या दिवशी मंदिर रात्रभर दर्शनासाठी खुले राहणार आहे. रात्रभर मंदिरात धार्मिक कार्यक्रम होतील.

मंदिरावर रोषणाई

डोंगरावर यंदा देवस्थान समितीने आधुनिक पद्धतीची विद्यूत रोषणाई केल्याने डोंगर परिसर उजळून निघाला आहे. रात्री रोषणाई पाहाण्यास गर्दी होत आहे.

ई पासमुळे गोंधळ

दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाचे मंदिर आज तब्बल आठ महिन्यांनी उघडले. ई पास काढण्यासाठी भाविकांचा गोंधळ उडाला. नेटवर्क कमी जास्त होत असल्याने अडथळा येत होयंत्रणा हळू हळू सुरू होती. वयोवृद्ध भाविकांनी आधार कार्ड नसल्याने कळस दर्शनावरच समाधान मानावे लागले, असे हे चित्र डोंगरावर पाहावयास मिळाले. भाविकांनी मास्क बंधनकारक आहे. त्या व्यतिरिक्त अन्य कार्यक्रमास पूर्णपणे बंदी राहील. मंदिरामध्ये सतत स्वच्छता कर्मचारी कार्यरत राहणार असून सकाळी दर्शनापूर्वी, दर्शन मार्ग व दर्शनाची जागा सॅनिटायझर करण्यात येणार आहे.

अत्यावशक सेवेसाठी ॲम्बुलन्सची सोय केली आहे. भाविकांनी दर्शन रांगेत ६ फूट अंतर ठेवावे लागणार आहे.

loading image
go to top