दुचाकीस्वार महिलेला वाचविताना दुभाजकावर चढला सिमेंटचा कंटेनर 

The cement container is mounted on the divider while saving a biker women
The cement container is mounted on the divider while saving a biker women

सोलापूर : दुचाकीस्वार महिलेला वाचविण्याच्या गडबडीत सिमेंट पोत्याने भरलेला कंटेनर पथदिव्याच्या खांबाला धडकून दुभाजकावर चढला. ही घटना पत्रकार भवन चौकात सोमवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास सुमारास घडली. 

सोमवारी दुपारी जड वाहतूक चालू असलेल्या वेळेत होटगी रस्त्यावरून सिमेंट घेऊन कंटेनर (एमएच 13-आर 4835) पत्रकार भवन चौकातून रेल्वे स्थानकाकडे निघाला होता. विजयपूर रस्त्याच्या दिशेने संभाजी तलाव पुलावरून दुचाकीस्वार महिला पत्रकार भवन चौकातून मोदीच्या दिशेने निघाली होती. अचानक समोर आलेल्या दुचाकीस्वार महिलेला वाचविण्याच्या गडबडीत कंटेनर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. कंटेनर दुभाजकातील पथदिव्याला धडकला. पथदिव्याचा खांब खाली कोसळला आणि कंटेनरची समोरील बाजू दुभाजकावर चढली. दुचाकीला धक्का लागून महिला जखमी झाली. 

या अपघातानानंतर वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या पथकाने लागलीच प्रयत्न सुरू केले. घटनेची माहिती नियंत्रण कक्षाला कळविण्यात आली. जखमी महिलेला उपचारासाठी पाठविण्यात आले. शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलिस निरीक्षक कमलाकर पाटील, सहायक पोलिस निरीक्षक विजयानंद पाटील आणि त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. कंटेनरमधील सिमेंट दुसऱ्या ट्रकमध्ये भरण्यात आले. क्रेन बोलावून अपघातग्रस्त वाहन बाजूला करण्यात आले. तोवर वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यात आली होती. 

याप्रकरणात कंटेनर चालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिस निरीक्षक पाटील यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com