निपाणीत दहावी परीक्षेसाठी १६ केंद्रे सज्ज

आजपासून परीक्षा : ४ हजार ३९८ परीक्षार्थी, तयारी पूर्ण
10th exam centre
10th exam centresakal

निपाणी : निपाणी शैक्षणिक तालु्क्यात उद्या सोमवारी (ता. २८) पासून दहावी वार्षिक परीक्षा सुरु होत आहे. शहर व ग्रामीण भागातील एकूण १६ परीक्षा केंद्रावर परीक्षा चालणार असून सर्व केंद्रे परीक्षेसाठी सज्ज झाली आहेत. शैक्षणिक तालुक्यात जवळपास ४ हजार ३९८ परीक्षार्थी परीक्षा देणार आहेत.

दहावी परीक्षेसाठी गट शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून मागील महिनाभरापासून तयारी चालली होती. यंदा तालुक्यात १६ परीक्षा केंद्रावर परीक्षा चालणार आहेत. त्यात निपाणी शहरात ५ तर ग्रामीण भागात ११ केंद्रांचा समावेश आहे. यंदा ४ हजार ३९८ परीक्षार्थी असून त्यात २ हजार १२४ विद्यार्थी तर २ हजार २७० विद्यार्थिनींचा समावेश आहे. गतवर्षी कोरोना संसर्गामुळे सोशल डिस्टन्स राखण्यासाठी केंद्रांची संख्या वाढवली होती. मात्र यावेळी एका केंद्रात बैठक व्यवस्थेची क्षमता वाढविण्यात आली आहे.

शहरात व्हीएसएम, केएलई इंग्लीश स्कूल, विद्या मंदिर, कन्या शाळा व मराठा मंडळ हायस्कूल ही पाच केंद्रे निश्चित झाली आहेत. तर ग्रामीण भागात कोगनोळी, बेनाडी, कुन्नूर, अक्कोळ, बोरगाव, कारदगा, बेडकिहाळ, गळतगा, सदलगा येथे परीक्षा केंद्र कार्यरत असतील. सदलगा येथे दोन केंद्रे आहेत. परीक्षेच्या पार्श्वभूमीवर यापूर्वी सर्व केंद्र प्रमुखांची शिक्षण सहसंचालक राजीव नाईक, गट शिक्षणाधिकारी

रेवती मठद यांनी बैठक घेऊन गैरप्रकाराला थारा न देण्याची ताकीद देऊन प्रक्रीया यशस्वीपणे पार पाडण्यास सांगितले आहे. सध्या सर्व केंद्रावर बैठक व्यवस्था झाली असून केंद्रावरील वर्ग खोल्यांचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. मुलभूत सुविधेसह इतरही आवश्यक ती दक्षता ज्या-त्या केंद्रावर घेण्यात आली आहे.

शैक्षणिक तालुक्यात दहावी परीक्षेसेसाठी सर्व परीक्षा केंद्रे सज्ज आहेत. तालुक्यात १६ केंद्रावर परीक्षा चालणार आहे. शिक्षण मंडळाच्या निकषानुसार आवश्यक ती खबरदारी घेतली आहे. परीक्षा प्रक्रीया यशस्वीपणे पार पडण्यासाठी उपाययोजना केल्या आहेत.

-रेवती मठद,गट शिक्षणाधिकारी, निपाणी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com