

Central Railway Issues Travel Advisory as Miraj Route Trains Remain Cancelled
sakal
मिरज : लोणावळा घाटातील खंडाळा मंकी हिलदरम्यान कोसळलेल्या दरडीमुळे मध्य रेल्वेने महत्त्वाचा निर्णय घेत मिरजमार्गे धावणाऱ्या अनेक लांब पल्ल्याच्या रेल्वे रद्द केल्या आहेत. १० ते १७ जुलै या कालावधीत सुटणाऱ्या या गाड्या रद्द केल्याने मिरज, सांगली, कोल्हापूर व परिसरातील हजारो प्रवाशांना मोठा फटका बसणार आहे.