नगर - राळेगणसिद्धीत लाक्षणिक-साखळी उपोषण

सूर्यकांत नेटके 
शुक्रवार, 23 मार्च 2018

नगर : शेतमालाला दर मिळण्यासह अन्य शेतकऱ्यांच्या मागण्या, लोकपाल व लोकायुक्त नियुक्तीसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिल्लीत आजपासून उपोषण सुरु केले आहे. त्यामुळे हजारे यांच्या गावी राळेगणसिद्धी (नगर) येथे नागरिकांनी साखळी-लाक्षणिक उपोषण सुरु केले आहे. सरकारने रेल्वे व गाड्या अडवल्याचा निषेध करत सरकारच्या पुतळ्याचे गावकऱ्यांनी दहन केले.

अण्णा हजारे यांनी शेतकऱ्यांच्या शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट बाजारभाव मिळावा, वयोवृद्ध शेतकऱ्यांना पेन्शन मिळावी, लोकपाल व लोकायुक्तची आंमलबजावणी करावी, तसेच निवडणुक कायद्यात सुधारणा करावी या आणि इतर मागण्यांसाठी आजपासून (ता. 23) दिल्ली येथे रामलीला मैदानावर बेमुदत उपोषण, सत्याग्रह अंदोलन सुरु केले आहे. त्यामुळे राळेगणसिद्धी येथे सरपंच रोहणी गाजरे, उपसरपंच लाभेश औटी, रोहीदास पठारे, अरुण भालेकर, सुभाष पठाडे, संजय पठाडे यांच्यासह गावकऱ्यांनी आज सकाळपासून लाक्षणिक-साखळी उपोषण सुरु केले.

गावकरी, महिला व शाळकरी मुले त्यात सहभागी झाले आहेत. दरम्यान दिल्लीतील हजारे यांच्या अंदोलनाला पाठिंबा देत सहभागी होण्यासाठी लोक दिल्लीकडे जात असताना केंद्र सरकार दडपशाही करुन रेल्वेगाड्या, वाहने अडवत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. सरकारच्या या कृतीचा निषेध करत गावकऱ्यांनी सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करत संताप व्यक्त केला. हजारे यांच्या अंदोलनाला पाठिंबा देत अन्य गावचे लोकही या अंदोलनात सहभागी होत आहेत.

Web Title: chain hunger strike at ralegansiddhi