karhad
karhad

यशवंतराव चव्हाणांच्या समाधीस्थळी साखळी उपोषण

कऱ्हाड : राज्यातील सर्व पक्षीय पंचायत समिती सभातीपद, उपसभापती व सदस्यांनी न्याय हक्कांसाठी येथील ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण समाधीस्थळी तीन दिवसीय साखळी उपोषणास आजपासून सुरूवात करण्यात आली. 

भाजप सरकारने 14 व्या वित्त आयोगाची निर्मिती केली आणि पंचायत सदस्यांचे सर्व अधिकार काढून घेतले. दोनवेळा आंदोलन करूनही सरकारने याची दखल घेतली नाही. त्यामुळे राज्यातील सर्व सदस्यांनी जेष्ठ नेते (कै.) चव्हाण यांची कर्मभूमी असलेल्या कऱ्हाड येथील प्रितीसंगमावरील त्यांच्या समाधीस्थळी तीन दिवसीय साखळी उपोषणास सुरुवात झाली.                      

पंचायत सदस्यांसाठी 14 व्या वित्त आयोगात पूर्वी प्रमाणे तरतूद व्हावी, जिल्हा नियोजन समितीमध्ये सभापतींना सदस्य म्हणून घेण्यात यावे, स्थानिक स्वराज्य संस्था, विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान करण्याचा अधिकार देण्यात यावा, सदस्यांना विकासकामांसाठी 50 लाखांपर्यंतचा निधी उपलब्ध करून द्यावा, मनरेगाअंतर्गत कामांची मंजुरी देण्याचा अधिकार सदस्यांना द्यावा, सार्वजनिक व वैयक्तीक लाभाच्या योजनेची मान्यता देण्याचा अधिकार पंचायत समिती सभागृहाला मिळावा, बाजार समितीमध्ये प्रतिनिधीत्व द्यावे, पदाधिकारी व सदस्यांचे मानधन वाढवावे, पंचायत समिती सदस्यांमधून एक सदस्य विधान परिषदेवर घ्यावा आदी मागण्यां साठी हे आंदोलन करण्यात येत आहे. सभापती फरिदा इनामदार, माजी सभापती शालन माळी, सदस्य रमेश चव्हाण, प्रणव ताटे तसेच राज्यभरातील विविध पंचायत समिती, सभापती, उपसभापती, सदस्य उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com