हरिनामाच्या घोषात पंढरी भक्तिमय 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 एप्रिल 2017

पंढरपूर - चैत्र शुद्ध कामदा एकादशीच्या सोहळ्यात राज्याच्या विविध भागातून दोन लाखांहून अधिक भाविक आज सहभागी झाले होते. 

टाळ मृदंगाचा गजर आणि हरिनामाचा जयघोषामुळे पंढरी भक्तिमय झाली होती. श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी मोठी रांग लागली होती. दर्शनासाठी आठ तास वेळ लागत होता. 

चैत्री एकादशीनिमित्त चंद्रभागेत स्नानाची पर्वणी साधण्यासाठी पहाटे चार वाजल्यापासूनच वारकऱ्यांनी गर्दी केली होती. अनेक भाविकांनी होडीतून पैलतीरावर जाऊन स्नान केले. नदीच्या पैलतीरावर तसेच वाळवंट आणि शहरातील मठ व धर्मशाळांमध्ये धार्मिक कार्यक्रम सुरू होते. 

श्री विठ्ठल मंदिर परिसर गर्दीने फुलून गेला होता. उन्हामुळे अंगाची काहिली होत असतानाही वारकऱ्यांनी भर उन्हात टाळ-मृदंगाच्या गजरात नगरप्रदक्षिणा पूर्ण केली. शिंगणापूर यात्रेला जाण्यापूर्वी चंद्रभागेत सासनकाठ्यांना स्नान घालून मंदिराभोवती प्रदक्षिणा घालण्याची प्रथा आहे. त्याप्रमाणे अनेक भाविक सासनकाठ्या घेऊन प्रदक्षिणा करून शिंगणापूर यात्रेला रवाना होत होते. 

मंदिर परिसरातील रस्त्याच्या दुतर्फा विक्रेत्यांनी ठाण मांडले होते. व्यापाऱ्यांनी यात्रेची जय्यत तयारी केली होती; परंतु यात्रेकरूंची संख्या कमी असल्याने अपेक्षित व्यापार झाला नसल्याचे स्थानिक व्यापाऱ्यांनी सांगितले. 

विठ्ठलाला पुरणपोळीचा नैवेद्य 
चैत्री एकादशी दिवशी श्री विठ्ठलाला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्याची प्रथा आहे. त्यानुसार आज श्री विठ्ठलाला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्यात आला. श्री विठ्ठलाची नित्यपूजा मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी संजय तेली यांच्या हस्ते सपत्नीक, तर श्री रुक्‍मिणीमातेची पूजा व्यवस्थापक विलास महाजन यांच्या हस्ते झाली. 

Web Title: Chaitra Ekadashi

टॅग्स