सकल मराठा समाजाचे उद्या सोलापुरात चक्काजाम आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 जुलै 2018

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळांतर्गत सुशिक्षित बेरोजगारांना बिनव्याजी कर्ज वाटप करावे. अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत बोगस के सेसचे रोखण्यासाठी जिल्हास्तरीय कमिटी नेमण्याच्या आश्‍वासनाची पूर्तता करावी, आर्थिक दुर्बल घटकातील मागास विद्यार्थ्यांना ज्याचे उत्पन्न आठ लाखाच्या आत आहे.

सोलापूर : मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत राज्य शासनाने काढलेली 36 हजार पदांची मेगा भरती थांबवावी. यासह विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी सकल मराठा समाजाच्यावतीने उद्या शनिवार (ता. 21) सकाळी 11 वाजता शिवाजी चौकात चक्काजाम आंदोलन होणार आहे.

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळांतर्गत सुशिक्षित बेरोजगारांना बिनव्याजी कर्ज वाटप करावे. अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत बोगस के सेसचे रोखण्यासाठी जिल्हास्तरीय कमिटी नेमण्याच्या आश्‍वासनाची पूर्तता करावी, आर्थिक दुर्बल घटकातील मागास विद्यार्थ्यांना ज्याचे उत्पन्न आठ लाखाच्या आत आहे. त्यांना ओबीसीप्रमाणे सर्व शैक्षणिक सुविधा देण्याचे दिलेले आश्‍वासन पाळावे, मुलींच्या वसतिगृहासाठी दोन एकर जागा व बांधकामांकरिता पाच कोटी रुपये निधी देण्याचे दिलेले आश्‍वासन पाळावे यासह इतर मागण्यांचा यामध्ये समावेश आहे.

या मागण्यांची तातडीने दखल घेऊन लवकरात लवकर कार्यवाही करण्याची तत्परता शासनाने दाखवावी. महाराष्ट्राच्या वैभवशाली परंपरेला मराठा समाजाकडून त्यांचा घोर अपमान झाल्यामुळे कोठेतरी गालबोट लागण्याची शक्‍यता निर्माण होईल असा इशाराही माऊली पवार यांनी दिला आहे.

Web Title: The Chakkajam movement of the gross Maratha community tomorrow at Solapur