चले जाव आंदोलन स्मारक निधीच्या गर्तेत

उमेश बांबरे
बुधवार, 8 ऑगस्ट 2018

सातारा - चले जाव आंदोलनात ज्या स्वातंत्र्यसैनिकांनी बलिदान दिले, त्यांची आठवण स्मारक रूपाने राहावी, यासाठी साताऱ्यात चले जाव आंदोलन स्मारक उभारण्याचे काम हाती घेण्यात आले. पण, निधीअभावी केवळ ऑगस्ट क्रांती स्तंभ उभारण्याचे काम झाले आहे. प्रत्यक्ष स्मारकाच्या कामासाठी लागणाऱ्या निधीसाठी केवळ आश्‍वासनांचाच पाऊस पडला आहे. या स्मारकाच्या कामाला हात कधी लागणार, असा प्रश्‍न सातारकर विचारू लागले आहेत.  

तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव सरकारने सातारा, बालिया, मिदनापूर या ठिकाणी चले जाव आंदोलन स्मारक उभारण्याचे ठरविले होते. त्यासाठी प्रत्येकी एक कोटी रुपयांचा निधी जाहीर केला होता. सातारा, सांगली जिल्ह्यांच्या वादामुळे सातारा जिल्ह्यातील स्मारक रखडले. दोन जिल्ह्यांच्या वादात अडकलेल्या या स्मारकाबाबत प्रशासकीय यंत्रणेनेही दुर्लक्ष केले. ‘चले जाव’ आंदोलनात सातारा जिल्ह्याचे मोठे योगदान होते.

त्यामुळे या चळवळीची माहिती चित्र रूपात देण्यासाठी हे स्मारक साताऱ्यात होणार होते. शासनाच्या निर्णयानुसार बालिया व मिदनापूर येथील हे स्मारक तातडीने उभारले गेले. साताऱ्यातील स्मारक मात्र अद्यापपर्यंत झाले नाही.

या स्मारकासाठी समिती जाहीर झाली. त्यामध्ये साताऱ्याचे तत्कालीन आमदार (कै.)अभयसिंहराजे भोसले या समितीचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शंकरराव जगताप, स्वातंत्र्यसैनिक नरूभाई लिमये हे सदस्य होते. समितीच्या चार बैठका झाल्या. त्यानंतरही सांगली जिल्ह्याने या स्मारकाच्या निधीतील वाटा मागण्यास सुरवात केली. पण, साताऱ्यातील स्वातंत्र्यसैनिकांची संघटना बळकट असल्याने हे स्मारक सातारा जिल्ह्यातच व्हावे, यासाठी संघटनेने पुढाकार घेतला. त्यासाठी स्वातंत्र्यसैनिकांचा मेळावा झाला व त्यात साताऱ्यातच स्मारक उभारण्याचा ठराव झाला. तो ठराव स्मारक समितीकडे पाठविल्यानंतर त्यास मान्यता मिळाली. स्मारकासाठी येथील बस स्थानकाशेजारील जागा देण्यात येऊन आराखडाही तयार झाला. पण, निधीच्या गर्तेत हे स्मारक आजपर्यंत झालेले नाही.

स्वच्छतेसाठी ‘श्रम सहयोग योजना’ 
चले जाव आंदोलन स्मारकाच्या नियोजित जागेच्या स्वच्छतेसाठी श्रम सहयोग योजना आखण्यात आली आहे. त्यामध्ये देशासाठी ज्यांना श्रम करायचे आहे, त्यांनी या स्मारकाच्या जागेत येऊन स्वच्छता करून श्रम सहयोग द्यावयाचा आहे. त्यासाठी स्वातंत्र्यसैनिकांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला आहे, असे सामाजिक कार्यकर्ते अस्लम तडसरकर यांनी सांगितले.

Web Title: chale jav andolan monument fund