तिकीट मिळण्याआधीच रोहित पवारांची कर्जत-जामखेडमध्ये 'विकेट'?

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 जुलै 2019

राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार हे कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार हे निश्चित झालं आहे. पण त्यांना कर्जत-जामखेड मतदारसंघातून त्यांची उमेदवारी धोक्यात आली आहे. त्यामुळे रोहित पवार यांना तिकीट मिळण्याआधीच त्यांची विकेट जाणार का? अशा चर्चांना राजकीय वर्तुळात जोर आला आहे.

नगर : राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार हे कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार हे निश्चित झालं आहे. पण त्यांना कर्जत-जामखेड मतदारसंघातून त्यांची उमेदवारी धोक्यात आली आहे. त्यामुळे रोहित पवार यांना तिकीट मिळण्याआधीच त्यांची विकेट जाणार का? अशा चर्चांना राजकीय वर्तुळात जोर आला आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीत आघाडी  होणार आहे. जागा वाटपावरून आघाडीत सुंदोपसुंदी सुरू आहे. कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला आहे. काँग्रेसने ही जागा राष्ट्रवादीला सोडण्यास नकार दिल्याने रोहित पवारांची विकेट जाणार की रोहित पवार दुसरा मतदारसंघ शोधणार? यावर जोरदार चर्चा रंगत आहेत. जामखेडची जागा यापू्र्वी काँग्रेसने लढवली होती आणि यंदाच्या विधानसभेलासुद्धा ही जागा काँग्रेसच लढवणार, असा आक्रमक पवित्रा काँग्रेसचे नगर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंखे यांनी घेतला आहे.

दुसरीकडे राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्ष मंजुषा गुंड यांनी देखील या जागेवर आपल्याला तिकीट मिळालं पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसकडे केली आहे. त्यामुळे रोहित पवार यांच्या उमेदवारीवर सध्या दुहेरी संकट निर्माण झालं आहे. दरम्यान, तिकीट मिळवण्यासाठी रोहित पवार यांना काँग्रेसबरोबर तर संघर्ष करावाच लागणार आहे पण स्वपक्षातील इच्छुकांना सुद्धा शांत करावं लागणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: challenge for rohit pawar candidature in Karjat Jamkhed assembly election