अवैध धंदे बंद करण्याचे आव्हान

तासगाव शहरातील गुन्हेगारी फोफावतेय; पोलिस बनले टीकेचे लक्ष्य
 Challenge to stop illegal businesses in Tasgaon city
Challenge to stop illegal businesses in Tasgaon city

तासगाव - तासगाव शहरातील शिवनेरी मंडळाचे अध्यक्ष अनिल जाधव यांच्या खुनानंतर शहरातील अवैध धंदे आणि त्यातून फोफावलेली गुन्हेगारी हा विषय ऐरणीवर आला असून, तासगाव पोलिस टीकेचे लक्ष्य बनले आहेत. मटका, जुगार, वाळू, गांजा, ‘कपल कॅफे’ यातून मोठ्या प्रमाणावर तरुण गुन्हेगारीकडे वळू लागले असून, ही गुन्हेगारी थोपवण्याचे आव्हान तासगाव पोलिसांसमोर आहे.

अवैध धंदे वाढले, की गुन्हेगारी फोफावते, हा एक सामाजिक सिद्धांत आहे. शहरात पाच दिवसांपूर्वी घडलेला हा प्रकार पाहिल्यानंतर गुन्हेगारी किती प्रमाणात वाढली आहे, याचे प्रत्यंतर आल्याशिवाय राहात नाही. शहरातील वाढती गुन्हेगारी आणि वाढते अवैध धंदे ही डोकेदुखी बनली आहे. गेल्या दोन-चार दिवसांपासून शहरातील अवैध धंदे चर्चेचा विषय बनले आहेत. प्रचंड वाढलेला मटका, सुरू असलेले जुगाराचे अड्डे, वाढता गांजा, सावकारी यातून प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे गुन्हेगारी पोसली जात आहे. ऐन पंचविशीतील मुले मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारीकडे ओढली जाऊ लागली आहेत. या मुलांवर पालकांचे अथवा पोलिसांचे कोणाचेही नियंत्रण नाही. अवैध धंद्यांच्या संरक्षणासाठी या टोळ्या तयार झाल्या आहेत. कोठेही धंद्याच्या ठिकाणी गडबड झाली की हे युवक धावून येतात. शहरातील काही चौक तर यासाठी प्रसिद्ध झाले आहेत. आता यात ‘कपल कॅफे’ नावाच्या धंद्याची भर पडली आहे. यातही ‘तेच’ तरुण सहभागी झालेले दिसत आहेत.

अनिल जाधव खूनप्रकरणी पोलिस टीकेचे लक्ष्य बनले आहेत. तासगाव पोलिसांचे गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण वाढलेले दिसत असले तरी गुन्हेगारी थोपवण्यात अपयश आलेले आहे. एकूणच, तासगाव शहर आणि तालुक्यातील अवैध धंदे आणि गुन्हेगारी थोपवण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.

केवळ ‘उद्दिष्टपूर्ती रेकॉर्ड’

पाच-सहा वर्षांपूर्वी तालुक्यातील मटका आणि गावठी दारूवर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने खूप मोठ्या कारवाया केल्या होत्या, मात्र त्यानंतर एकही मोठी कारवाई पोलिसांकडून झाली नाही. आता मटक्यावर महिन्यातून ठराविक वेळी कारवाई होते आणि केवळ ‘उद्दिष्टपूर्ती रेकॉर्ड’ बनविले जाते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com