कोल्हापूर परिसरात आणखी दोन दिवस पावसाची शक्यता

कोल्हापूर परिसरात आणखी दोन दिवस  पावसाची शक्यता

कोल्हापूर - दक्षिण-पश्‍चिम बंगालच्या खाडीवर कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे तमिळनाडू, केरळ आणि कर्नाटकच्या सीमाभागासह महाराष्ट्रातही जोरदार पावसाची शक्‍यता आहे.

दरम्यान, गोव्याहून कोल्हापूरकडे सरकणारा पाऊस आणखी दोन दिवस म्हणजे उद्या (बुधवार) आणि गुरुवार जिल्ह्यातील ठिकठिकाणी तडाखा देण्याची शक्‍यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे. शुक्रवारपासून पाऊस कमी होऊन पुन्हा थंडी अनुभवता येईल, असेही वेधशाळेने म्हटले आहे, मात्र ऐन हिवाळ्यात पावसाने आरोग्य आणि शेतीवर परिणाम होत आहे. 

अवेळी पावसाने विजांच्या कडकडाटासह जोतिबा डोंगर परिसर, नृसिंहवाडी तसेच शिरोळ तालुक्‍याला झोडपले. सोमवारी पहाटेपासून सुरू झालेल्या पावसाने ऊस तोडी पूर्णपणे ठप्प आहेत. शहरासह जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण आणि गार वारा आहे. शहरात तुरळ पाऊस होता, मात्र जोतिबा डोंगर आणि शिरोळ तालुक्‍यात मुसळधार कोसळला.

दिवाळी सुटीनिमित्त जोतिबा, पन्हाळा येथे आलेल्या पर्यटकांचे हाल झाले. अंबाबाईचे दर्शन घेतलेल्या भाविकांनी दुपारी बारानंतर जोतिबावर पडणाऱ्या जोरदार पावसाचा अंदाज घेऊनच जोतिबा-पन्हाळ्याकडे जाणे पसंद केले. दरम्यान, कोकण, कोल्हापूरसह मराठवाड्यातही चोवीस तासात जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे.

शेतीवरील परिणाम
-फळ आणि पालेभाज्यांवर किडींचा प्रादुर्भाव होत आहे. 
- ऊसतोडी ठप्प, तोडलेला ऊस तसाच पडून 
- रब्बीवरही परिणाम होऊ शकतो

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com