"सकाळ' चंदगड कार्यालयाचा  वर्धापन दिन 

वृत्तसंस्था
सोमवार, 30 जानेवारी 2017

चंदगड - येथील "सकाळ' संपर्क कार्यालयाचा 15 वा वर्धापन दिन (ता. 30) साजरा होत आहे. यानिमित्त व्याख्यान आणि स्नेहमेळावा होणार आहे. पंचायत समितीच्या सभागृहात सायंकाळी चार वाजता व्याख्यान आणि त्यानंतर स्नेहमेळावा होईल.

चंदगडसारख्या दुर्गम भागात सर्वांत प्रथम "सकाळ'ने आपले कार्यालय सुरू केले. दीड दशकात येथील सामाजिक, शेती, राजकारण, शिक्षण, अर्थकारण या प्रत्येक क्षेत्रातील घडामोडींचा "सकाळ' साक्षीदार राहिला आहे. तालुक्‍याच्या विकासात "सकाळ'चे योगदान महत्त्वपूर्ण आहे. स्थानिक जनता आणि वाचकांच्या पाठबळावर "सकाळ'ने या विभागात आपले वेगळे वैशिष्ट्य निर्माण केले आहे.

पंधरा वर्षांत दरवर्षी वेगळा विषय घेऊन "सकाळ'ने वर्धापन दिनाचे विशेषांक प्रसिद्ध केले आणि ते वाचकांच्या पसंतीला उतरले. या वेळी "आरोग्य' विशेषांक वाचकांसाठी आकर्षण आहे. यात तालुक्‍यातील वैद्यकीय क्षेत्राचा आढावा घेतला आहे. खास करून या भागातील आजार आणि सुदृढ आरोग्यासाठी उपाययोजनाही सुचवल्या आहेत. दरम्यान, सायंकाळी चार वाजता प्रसिद्ध दूर्ग अभ्यासक डॉ. अमर अडके यांचे "सशक्त मन-सशक्त शरीर आणि शिवचरित्र' या विषयावर व्याख्यान होईल. त्यानंतर स्नेहमेळावा होईल. कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन "सकाळ'च्या वतीने केले आहे. 

Web Title: Chandgad 'SAKAL' Anniversary

टॅग्स