पंढरपूरमध्ये चंद्रभागेच्या पाण्यात वाढ...

अभय जोशी
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

पंढरपूर ः वीर धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे पंढरपूर येथील चंद्रभागा नदीची पाण्याची पातळी वाढली आहे. श्री पुंडलिक मंदिरासह लगच्या मंदिरांना पाण्याने वेढले आहे. आज (बुधवार) श्रावण महिन्यातील पुत्रदा एकादशीमुळे श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी यात्रेप्रमाणे गर्दी झाली आहे. एव्हढी गर्दी होईल असा प्रशासनास अंदाज न आल्याने नियोजनाचा अभाव दिसून आला.

श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवसांपासून श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत आहे. आज पुत्रदा एकादशीची पर्वणी साधण्यासाठी एक लाखाहून अधिक भाविक आलेले आहेत. चंद्रभागेत स्नानासाठी देखील पहाटे पासून गर्दी होती. परंतु प्रशासनाने आजच्या दिवसाचे योग्य नियोजन केलेले दिसत नाही.

अनेक रस्त्यांवर जागोजागी विक्रेत्यांनी अतिक्रमणे केली आहेत. रस्त्यांवर फेरीवाल्यांची गर्दी केली आहे. वाहने रस्त्यांवर ठिकठिकाणी उभा करण्यात आली आहेत. त्यामुळे मंदिर परिसर, प्रदक्षिणा मार्ग आदी भागात भाविकांना चालणे मुश्‍कील झाले आहे. श्री विठ्ठलाच्या दर्शनाची रांग पत्राशेड पर्यंत गेली आहे परंतु रांगेच्या नियंत्रणासाठी नियुक्त केलेल्या पोलिसांचे पूर्ण दुर्लक्ष असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. विप्रदत्त घाट आणि भुतेश्‍वर मंदिर येथे रांगेत भाविक घुसखोरी करत होते. त्यामुळे रांगेत गोंधळ होत होता. आज श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी सात तास लागत होते. दर्शन घेऊन मंदिरातून बाहेर आलेले गणपत पाटील (रा.बत्तीस शिराळा) "सकाळ" शी बोलताना म्हणाले, आज पहाटे चार वाजता पत्राशेड जवळ रांगेत उभा राहिलो. सात तासानंतर दुपारी अकरा वाजता दर्शन झाले.

Web Title: Chandrabhaga river water level in Pandharpur