टेंभू योजनेचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढू - चंद्रकांत पाटील

टेंभू योजनेचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढू - चंद्रकांत पाटील

दिघंची - दुष्काळी भागाला वरदाई ठरणारी टेंभू योजनेच्या पूर्णत्वासाठी व आमदार अनिल बाबर यांचे या योजनेबाबत असणारे स्वप्न पूर्ण करण्यासाठी लवकरच मंत्रालयात मुख्यमंत्री  व जलसंपदा मंत्री यांच्या उपस्थितीत बैठक लावू  व टेंभू योजनेचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढू असे प्रतिपादन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिघंची येथे केले.

दिघंची येथून जाणाऱ्या राज्यमार्गाच्या एकूण ६८८ कोटी रुपयाच्या कामाच्या उद्घाटनप्रसंगी येथे आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्यात मंत्री पाटील बोलत होते. यावेळी आमदार अनिल बाबर, पृथ्वीराज देशमुख, भाजपच्या नीता केळकर, जि. प. अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, तानाजीराव पाटील, सरपंच अमोल मोरे यांची प्रमुख उपस्थिती  होती.

मंत्री पाटील म्हणाले, २०१४ रोजी पंतप्रधान नरेद्र मोदी  व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेला पायाभूत सुविधा देण्याचे  स्वप्न पहिले. रस्त्याचा विकास झाल्याशिवाय गावाचा विकास होणार नाही, यासाठी १७०० कोटीचे रस्त्याचे असणारे बजेट सहा हजार कोटीवर नेले. रस्त्यासाठी एक लाख सहा हजार कोटी केंद्राने महाराष्टाला दिले. परिणामी बावीस हजार कि. मी. रस्ता चौपदरीकरण होणार आहे. दुष्काळात शेतकऱ्यांनी घाबरून जावू नये, शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे .  टँकर ऐवजी कायमस्वरूपी पाणी योजनेतून पिण्याचे पाणी देवू.  लवकरच १७९ गावाचा टंचाईसदृश्य म्हणून घोषित करू त्यामध्ये आटपाडी ताल्युकाचा समावेश असेल.

यावेळी आमदार अनिलभाऊ बाबर म्हणाले की. आज दिघंची - भिवघाट १२५  कोटी ,आटपाडी –शेटफळे  ५४ कोटी ,मायणी – उंबरगाव  ६६  कोटी  व दिघंची ढोले मळा  २ कोटी  ३९ लाख अश्या  एकूण सव्वा दोनशे  कोटी रुपयाचे आटपाडी तालुक्यातील रस्त्याचे उद्घाटन झाले .सध्या चार टीएमसी पाणी सिंचनाचे वाहून जात आहे. ते पाणी पिण्यासाठी वापरात यावे, यासाठी प्रयत्न आहे. तर भविष्यात माझ्या मतदार संघामध्ये कृष्णेच्या पाण्यापासून एकही गाव वंचित राहणार नाही  यासाठी माझा प्रयत्न असुन यासाठी मला मदत करावी, असे यावेळी सांगितले.

जि. प. सदस्य तानाजीराव पाटील, सरपंच अमोल मोरे, ग्रा. पं.सदस्य बाळासाहेब होनराव यांनी मनोगत व्यक्त केले. 

आटपाडी तालुक्याला दादा तुम्ही भरभरून निधी दिला व त्या निधीची परतफेड आम्ही तुमच्या विचाराचा उमेदवार देवून पूर्ण करू. 

- तानाजीराव पाटील, जि. प. सदस्य.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com