पालकमंत्री-खासदार महाडिक यांच्यात गुफ्तगू 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 फेब्रुवारी 2017

कोल्हापूर - जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील व राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक यांच्यात आज शासकीय विश्रामगृहावर बंद खोलीत चर्चा झाली. जिल्हा परिषदेच्या सत्ताकारणात जुळवाजुळव सुरू असल्याच्या पार्श्‍वभूमीवर या दोघांत झालेल्या भेटीला व चर्चेला महत्त्व प्राप्त झाले आहे. 

दरम्यान, दोघांत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसून, सीमाप्रश्‍नाबाबत बैठकीसाठी विश्रामगृहावर गेलो असताना पालकमंत्री पाटील यांची भेट झाली, असे खासदार महाडिक यांनी सांगितले. 

सीमाप्रश्‍न, सर्किट बेंचसह इतर प्रश्‍नांचा आढावा घेण्याच्या निमित्ताने पालकमंत्री पाटील आज शासकीय विश्रामगृहावर थांबून होते. बैठकीपूर्वी त्यांची काहींनी भेट घेतली. यात खासदार महाडिक यांचा समावेश होता. या दोघांनी बंद खोलीत दीर्घकाळ चर्चा केली. चर्चेचा तपशील समजला नाही; पण जिल्हा परिषदेचे सत्ताकारण हेच या चर्चेच्या केंद्रस्थानी असल्याची चर्चा आहे. 

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत खासदार महाडिक राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रचारापासून अलिप्तच होते. निवडणुकीच्या सुरवातीला पक्षाच्या उमेदवारांसाठी प्रचार करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली होती. मात्र, प्रत्यक्षात ते प्रचारात कुठेच दिसले नाहीत. पक्षानेही त्यांना बेदखल करत प्रचाराच्या जाहिरातीतून त्यांची छबी गायब केली. जिल्हा परिषद निकालात त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्याच्या पातळीवर सेना-भाजप युती टिकली तर या दोघांची एकहाती सत्ता जिल्हा परिषदेवर येईल; पण हा गुंता सुटला नाही तर काय करायचे? हा प्रश्‍न सर्वांसमोरच आहे. 

....त्यानंतर अंतिम निर्णय 
पालकमंत्री पाटील व खासदार महाडिक यांच्या चर्चेला महत्त्व प्राप्त झाले आहे. श्री. महाडिक यांचे चुलते व माजी आमदार महादेवराव महाडिक हे भाजपसोबत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखालील ताराराणी आघाडीला तीन जागा मिळाल्या आहेत. सत्ता स्थापनेत सद्यःस्थितीत या तिन्हीही जागा भाजपसोबत राहतील; पण अध्यक्ष कोण असेल, यावर अंतिम निर्णय होणार आहे.

Web Title: Chandrakant Patil & Dhananjay Mahadik between discussion