esakal | 'भाजप'ला आव्हान 'राष्ट्रवादी'चे; जयंतराव-चंद्रकांतदादा पुन्हा आमने-सामने
sakal

बोलून बातमी शोधा

'भाजप'ला आव्हान 'राष्ट्रवादी'चे; जयंतराव-चंद्रकांतदादा पुन्हा आमने-सामने

महापौरपदाच्या निवडणुकीनंतर पुन्हा एकदा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आमने-सामने येत आहेत.

'भाजप'ला आव्हान 'राष्ट्रवादी'चे; जयंतराव-चंद्रकांतदादा पुन्हा आमने-सामने

sakal_logo
By
बलराज पवार

सांगली : महापालिका स्थायी समितीच्या नूतन सभापती निवडीचा कार्यक्रम दोन दिवसात जाहीर होण्याची शक्यता आहे. (Political News) सध्या जरी स्थायी समितीमध्ये भाजपचे वर्चस्व असले तरी सभापती निवडीत बाजी पलटवण्याच्या प्रयत्नात काँग्रेस (Congress) आघाडी आहे. त्यामुळे महापौरपदाच्या निवडणुकीनंतर पुन्हा एकदा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) आमने-सामने येत आहेत.

महापालिकेत भाजप ४१, काँग्रेस १९ आणि राष्ट्रवादी १५ अशी सदस्यसंख्या आहे. दोन अपक्ष आहेत. एक जागा रिक्त आहे. (Sangli Update) त्याआधारे स्थायीतील सदस्य संख्या निश्‍चित होते. तीन वर्षापुर्वी भाजपने पुर्ण बहुमताने सत्ता घेतली. मात्र सहा महिन्यांपूर्वी झालेल्या महापौर, उपमहापौर निवडणुकीत भाजपचे (BJP) सहा सदस्य व एक सहयोगी सदस्य फुटला आणि राष्ट्रवादीचे दिग्विजय सूर्यवंशी महापौर झाले. त्यावेळी भाजपचे संख्याबळ घटले. मात्र स्थायी समितीमध्ये जास्त सदस्य असल्यामुळे स्थायी समिती अजूनही भाजपच्या ताब्यात आहे.

हेही वाचा: 'बिरोबा वाटोळ करतो, तर मी आमदार कसा झालो?'

स्थायी म्हणजे महापालिकेची तिजोरीच आहे. ती ताब्यात घेण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादीचे प्रयत्न आहेत. त्यासाठी एक डाव स्थायी समितीच्या आठ सदस्यांच्या निवडीच्या महासभेत टाकला मात्र तो फसला. भाजपच्या सहा फुटीर व दोन अपक्ष सहयोगी सदस्यांचा स्वतंत्र गट स्थापन करून भाजपचे संख्याबळ घटवण्याची खेळी रचली गेली. यामुळे स्थायी समितीमधील भाजपची सदस्य संख्या कमी होऊन काँग्रेसचा वाढेल असा प्रयत्न होता, पण ती फोल ठरली.

आता पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या स्थानिक कारभाऱ्यांकडून डाव खेळले जात आहेत. नुकतेच मूळ काँग्रेसचे पण सध्याचे भाजपवासी झालेले नेते सुरेश आवटी यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या. आवटी यांना पुत्र निरंजन यांना महापौर करण्याची इच्छा होती. सत्तापालटामुळे ती अपुरी राहिली आहे. निरंजन आता सभापतीपदासाठी इच्छुक आहेत.

हेही वाचा: जलसंपदामंत्री 'करेक्ट कार्यक्रमाच्या' तयारीत

बलाबल असे...

‘स्थायी’त भाजपचे ९, काँग्रेसकडे ४ तर राष्ट्रवादीचे ३ सदस्य आहेत. आघाडीला किमान तीन सदस्य फोडावे लागतील. हे गणित जमवण्यासाठी हालचाली सुरु आहेत. त्याचवेळी भाजपकडूनही प्रतिडाव खेळले जात आहेत. पर्यायी सदस्य संख्या उभी करण्याच्या हालचाली आहेत. शिवाय व्हिप बजावून सदस्यांना रोखण्याचा प्रयत्न होईल. मात्र, महापौर निवडीवेळी भाजपने व्हिप बजावूनही ६ सदस्य फुटले होते. गेल्या वर्षीही भाजपची सत्ता असताना स्थायीत असा प्रयत्न झाला होता. आगामी काळात सत्ता राबवण्यासाठी स्थायी सभापतीपद महत्वाचे आहे. त्यामुळे दोन्ही प्रदेशाध्यक्ष पुन्हा एकदा समोरासमोर आले आहेत.

loading image
go to top