esakal | 'बिरोबा वाटोळ करतो, तर मी आमदार कसा झालो?' पडळकरांचा जलसंपदा मंत्र्यांवर पलटवार
sakal

बोलून बातमी शोधा

'बिरोबा वाटोळ करतो, तर मी आमदार कसा झालो?'

'बिरोबा माझा आहे, मी आणि बिरोबा बघून घेतो', जयंतरावांनी त्याची काळजी करू नये.

'बिरोबा वाटोळ करतो, तर मी आमदार कसा झालो?'

sakal_logo
By
अजित झळके

सांगली : राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी आरेवाडी येथील बिरोबा वनात आमदार गोपीचंद पडळकर यांचे नाव न घेता ‘बिरोबा खोटी शपथ घेणाऱ्यांची वाट लावतो’, अशी टोलेबाजी केली होती. त्यावर आज पडळकर यांनी जोरदार पलटवार केला आहे. ‘बिरोबा माझा आहे आणि आमचे आम्ही बघून घेतो. बिरोबा वाटोळं करतो, तर मग मी आमदार (Gopichand Padalkar) कसा झालो?’, असा सवाल त्यांनी केला.

हेही वाचा: विद्यार्थ्यांसाठी खुशखबर; 'बस'सेवा पूर्ण क्षमतेने सुरु होणार

गोपीचंद पडळकर यांनी आमदार झाल्यापासून जयंत पाटील यांच्याविरोधात सातत्याने हल्लाबोल केला आहे. त्या-त्यावेळी जयंत पाटील यांनी पडळकर यांच्याबाबत ‘डिपॉझिट जप्त झालेले उमेदवार’, अशी अदखलपात्र प्रतिक्रिया दिली होती. पहिल्यांदाच त्यांनी पडळकर यांना कोपरखळी हाणण्याची संधी बिरोबा बनात आरेवाडी येथे साधली. आमदार पडळकर यांनी लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी घेतली होती. त्यावेळी प्रचार सभेत त्यांनी बिरोबाची शपथ घेत ‘मी कधीही भाजपमध्ये (BJP) जाणार नाही, बिरोबाची शपथ घेऊन सांगतो, भाजपमध्ये गेलो तर मला मत देऊ नका’, असे जाहीर केले होते. त्या निवडणूकीत ते पराभूत झाले. त्यानंतर काही महिन्यांतच भाजपमध्ये प्रवेश घेतला, ते विधान परिषदेचे आमदार झाले. तेव्हापासून त्यांच्यावर ‘खोटी शपथ’ या मुद्यावरून हल्लाबोल होतोय. जयंत पाटील यांनीही त्याच मुद्यावरून निशाणा साधला होता.

हेही वाचा: जलसंपदामंत्री 'करेक्ट कार्यक्रमाच्या' तयारीत

यावर उत्तर देताना पडळकर म्हणाले, ‘‘बिरोबा माझा आहे, मी आणि बिरोबा बघून घेतो. जयंतरावांनी त्याची काळजी करू नये. भाजपने केलेल्या कामांचे नारळ फोडायचा तुम्हाला काय अधिकार? तुम्ही अशा पक्षात काम करता ज्याचा राष्ट्रीय अध्यक्ष कधीच बदलणार नाही. मी भाजपचा कार्यकर्ता आहे. पडळकरवाडीसारख्या छोट्या गावातून आलो. माझ्या गावापासून आठशे किलोमीटर अंतरावर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) बसले होते. त्यांना हा सामान्य कार्यकर्ता दिसला आणि त्यांनी मला आमदार केले, हे फक्त भाजपमध्ये होऊ शकते. हाच एकमेव पक्ष आहे, ज्यात सर्वाधिक मराठा, ओबीसी, दलित, महिला आमदार आहेत.’’

loading image
go to top