

सांगली महापालिकेच्या सत्तासमीकरणावर चंद्रकांत पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. जयश्री पाटील यांना झुकतं माप मिळणार का?
esakal
Sangli Miraj Politics : सांगली, मिरज, कुपवाड महापालिका निवडणुकीत भाजपने जिंकलेल्या ४३ जागांवर आम्ही लढणार हे फिक्स आहे. पक्षात नव्याने आलेल्या आणि घटकपक्षातील उमेदवारांना हाच न्याय असेल. तेथे उमेदवार कोण द्यायचे, हा निर्णय सर्व्हेनंतर मेरिटवर होईल. उर्वरित जागांबाबत योग्य निर्णय घेतला जाईल, निष्ठावंतांवर अन्याय होणार नाही, अशी भूमिका पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज पत्रकारांशी बोलताना जाहीर केली.