Chandrayaan-3 : सातारच्या भोसलेंचे चांद्रयान-३ मोहिमेत योगदान, जवळेच्या सुपुत्राचे होतंय कौतुक

भारताने अवकाश क्षेत्रात विक्रमी चांद्रविजय मिळवत आपले चांद्रयान -३ चंद्रावर उतरवले.
Bhanudas Bhosale
Bhanudas Bhosaleesakal

खंडाळा - भारताने अवकाश क्षेत्रात विक्रमी चांद्रविजय मिळवत आपले चांद्रयान -३ चंद्रावर उतरवले. या अभियानात खेड शिवापूर (पुणे) येथील व्हीसीबी इलेक्ट्रॉनिक कंपनीचे संचालक जवळे (ता. खंडाळा) येथील रहिवासी भानुदास भोसले यांचे मोठे योगदान असल्याने त्यांच्यावर अनेकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला.

इस्त्रोच्या चांद्रयान मोहिमेत खेड शिवापूर (पुणे) येथील व्हीसीबी इलेक्ट्रॉनिक कंपनीचा मोलाचा वाटा आहे. जवळे येथील भानुदास भोसले हे कंपनीचे संचालक म्हणून या मोहिमेसाठी अनेक बैठकांत उपस्थित राहून त्यांनी या कंपनीमार्फत मोठे योगदान दिले. येथील उत्पादित होणाऱ्या सुमारे ५० घटकांचा वापर या मोहिमेत केला आहे. श्री. भोसले हे जवळेचे माजी उपसरपंच संजय भोसले यांचे बंधू आहेत.

इस्त्रोच्या चांद्रयान मोहिमेत जवळे गावातील सुपुत्राने मोलाचे कार्य पार पाडल्याबद्दल सार्थ अभिमान वाटतो, अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेऊन स्वतःची कंपनी सुरू करून आज गावचे नाव उज्ज्वल केल्याबद्दल ग्रामस्थांनी भानुदास भोसले यांचे अभिनंदन केले आहे.

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे उतरलेल्या विक्रम व्हीसीबी कंपनीने उत्पादित केलेल्या अतिसूक्ष्म घटकांचा वापर करण्यात आला होता. संचालक भानुदास भोसले यांनी या मोहिमेसाठी लागणाऱ्या वस्तूंचा पुरवठा केला होता. या मोहिमेस मिळालेल्या यशाबद्दल व्हीसीबी कंपनीवर देखील अभिनंदनाचा वर्षाव होत आहे, तर विक्रम लँडर व प्रज्ञान रोव्हरमध्ये या कंपनीतील समभाग बसविण्यात आले आहेत.

याबरोबरच आम्ही क्षेपणास्त्रे व इतर उपकरणांचे घटक बनविले आहेत. चांद्रयान-३ यशस्वी झाल्याचा सार्थ अभिमान वाटतो, असे व्हीसीबी कंपनीचे संचालक भानुदास भोसले यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com