सकाळची कोल्हापूर पॅसेंजर आजपासून हातकणंगलेपर्यंतच

सकाळची कोल्हापूर पॅसेंजर आजपासून हातकणंगलेपर्यंतच

मिरज - मिरज - कोल्हापूर रेल्वेमार्गावरील विद्युतीकरणाच्या कामासाठी रेल्वे प्रशासनाने आज (ता. २४)पासून पुढील रविवार (ता. ३१) पर्यंत सकाळी साडेआठच्या पॅसेंजर गाडीचे नियोजन बदलले आहे. 

मिरजहून सकाळी साडेआठला निघणारी ही गाडी आजपासून हातकणंगलेपर्यंतच धावणार आहे. त्यानंतर ती सकाळी ११.२० ला हातकणंगलेहून सुटून मिरजेला येणार आहे. हे नियोजन ३१ मार्चपर्यंत केवळ सकाळी साडेआठच्या पॅसेंजर गाडीसाठी आहे, तसेच याच मार्गावरील अन्य कोणत्याही गाड्यांचे वेळापत्रक अथवा थांब्यांमध्ये बदल करण्यात आलेला नाही. या गाडीशिवाय कोल्हापूरहून सुटणाऱ्या आणि कोल्हापूरपर्यंत धावणाऱ्या सर्व गाड्या नियोजनाप्रमाणेच धावतील, असेही मध्य रेल्वे प्रशासनातर्फे जाहीर करण्यात आले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com