सत्ता बदलल्याने परिवर्तन होणार नाही - अण्णा हजारे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 मे 2018

राळेगणसिद्धी - भविष्यात फक्त सत्ता बदलल्याने देशात खरे परिवर्तन होणार नाही. त्यासाठी व्यवस्था परिवर्तनाची नवी चळवळ उभी करावी लागेल, असे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी म्हटले आहे. 

हजारे यांनी पत्रकात म्हटले आहे, की देशात विविध राजकीय पक्ष आणि त्यांच्यात सत्तेसाठी सुरू असलेली स्पर्धा व एकमेकांवरील आरोप- प्रत्यारोपांमुळे राज्याचा व देशाचा विकास खुंटला आहे. राजकीय पक्ष सामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्याऐवजी फक्त, आपली सत्ता कशी येईल यासाठीच प्रयत्नशील असतात. "सत्तेतून पैसा व पैशातून सत्ता' या चक्रव्यूहात राजकीय पक्षाचे कार्यकर्ते अडकले आहेत. 

वर्षभरात संघटन उभे करावे 
नव्याने संघटनेची बांधणी करण्याकरिता राळेगणसिद्धी येथे 28 व 29 एप्रिल रोजी राज्यातील 13 जिल्ह्यांतील प्रतिज्ञापत्रे भरून दिलेल्या 125 कार्यकर्त्यांची कार्यशाळा घेण्यात आली. पुढील टप्प्यात प्रत्येकी 125 ते 150 कार्यकर्त्यांच्या तुकडीप्रमाणे चार ते पाच कार्यशाळा घेऊन 750 कार्यकर्ते प्रशिक्षित करून त्यांनी आपापल्या जिल्हा, तालुका व गावामध्ये संघटन उभे करावे, अशी अपेक्षा असल्याचे हजारे यांनी म्हटले आहे.

Web Title: Changing power only in future will not change the country