गड्ड्यावर लेझर शोमधून दिसणार श्री सिद्धेश्‍वरांचे चरित्र 

The character of Shri Siddheshwara will be seen from the laser show on the pit
The character of Shri Siddheshwara will be seen from the laser show on the pit

सोलापूर : ग्रामदैवत श्री सिद्धेश्‍वर महाराजांच्या यात्रेत यंदा दारूकामाबरोबरच 40 मिनिटांचा लेझर शो दाखविण्याचा निर्णय श्री सिद्धेश्‍वर देवस्थान समितीने घेतला आहे. बेंगलोर येथील श्री कृष्णा ड्रीम वर्क या कंपनीला काम देण्यात आले आहे. दारूकाम ज्या ठिकाणी होते, त्याच परिसरात हा लेझर शो होणार आहे. दारूकामामुळे होणारे वायू प्रदूषण थांबवावे व त्याऐवजी नवे काहीतरी द्यावे या हेतूने "सकाळ' च्या माध्यमातून मंदिर समितीला आवाहन करण्यात आले होते. त्याचा "सकाळ'ने वारंवार पाठपुरावाही केला आहे. त्यास आता यश येत आहे. समितीने यंदा दारूकामाबरोबरच लेझर शो दाखविण्याचा निर्णय घेतला. 
हेही वाचा : जयंत पाटलांनी घेतली सोलापूर झेडपीतील पराभवाची माहिती
लेझर शो दरम्यान श्री सिद्धेश्‍वर महाराजांचे चरित्र उलगडून दाखविले जाणार आहे. लेझर शो झाल्यानंतर शोभेचे दारूकाम होईल, असे मंदिर समितीतर्फे सांगण्यात आले. लेझर शोचे यंदा पहिले वर्ष असून भाविकांचा प्रतिसाद व मागणीनुसार त्यात बदल केला जाईल, असेही मंदिर समितीने स्पष्ट केले. भाविकांनी सांस्कृतिक महोत्सवाची मागणी केल्यास अथवा पूर्णपणे लेझर शो असावा, अशी मागणी केल्यास त्याचाही सकारात्मक विचार केला जाईल, असे मंदिर समितीकडून सांगण्यात आले. 

 असा असणार लेझर शो 

  • सुरवातीच्या 20 मिनिटांत भीम शोच्या माध्यमातून मैदानावर तयार होणार मानवनिर्मित धुके 
  • त्यानंतर साउंड सिस्टिमद्वारे देशभक्तिपर गीतांचा होणार गजर 
  • श्री सिद्धेश्‍वर महाराजांवर आधारित गीतांसह भक्तिगीतांची भाविकांना मिळणार मेजवानी 
  • मानवनिर्मित धुक्‍यावर साकारण्यात येणार गाण्याला अनुसरून प्रतिकृती 
  • मोठ्या बॅल्क कर्टनवर श्री सिद्धेश्‍वर माहात्म्य, सिद्धेश्‍वर महाराजांच्या जीवनातील प्रसंग दाखविले जाणार 

करमणुकीचे कार्यक्रम घेण्यात येणार

होम मैदानाच्या जागेवर धुळीमुळे नागरिकांना त्रास होत असल्याचे समोर आल्यानंतर गेल्या चार वर्षांपासून धूळमुक्त यात्रा करण्यासाठी आपण विविध उपाययोजना केल्या आहेत. शेवटच्या दिवशी होणाऱ्या दारूकामातून हवाप्रदूषण होत असल्याचे समोर आल्यानंतर या वर्षीपासून प्रथमच आम्ही लेझर शोचा पर्याय शोधत आहोत. काही प्रमाणात दारूकाम व काही प्रमाणात लेझर शो यावर्षीपासून करण्याचे नियोजन आहे. लेझर शोच्या माध्यमातून सिद्धेश्‍वर चरित्र, करमणुकीचे कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. सिद्धेश्‍वर मंदिर व सोलापूर आध्यात्मिक सेंटर व्हावे अशा पद्धतीने आमचे नियोजन आहे. 
- धर्मराज काडादी, देवस्थान समिती अध्यक्ष 

स्वयंसेवकांची नेमणूक करण्यात येणार​

ग्रामदैवत सिद्धेश्‍वर यात्रा पर्यावरणपूरक व्हावी यासाठी नंदीध्वज मिरवणूक मार्गावर मिरवणूक पुढे गेल्यानंतर निर्माल्य व कचरा पडलेला असतो, तो उचलण्यासाठी स्वयंसेवकांची नेमणूक करण्यात येणार आहे. त्याचबरोबर यात्रा कालावधीत होम मैदानावर धूळ उडू नये यासाठी टॅंकरने पाणी मारण्यात येणार आहे. 
- राजशेखर हिरेहब्बू, यात्रेतील प्रमुख मानकरी 
हेही वाचा : झेडपी अद्यक्षपदामुळे मोहितेंचे समाधान?
सोलापुरात कोरडी हवा असल्याने मोठ्या प्रमाणावर धुळीचे साम्राज्य आहे. त्यामुळे ग्रामदैवत सिद्धेश्‍वर यात्रा ही पर्यावरणपूरक होणे गरजेचे आहे. त्याचबरोबर दारूकामाच्या वेळी मोठ्या प्रमाणावर हवा व धूळ प्रदूषण होते. त्याच्या ऐवजी यंदा मंदिर समितीच्या वतीने इलेक्‍ट्रिक लेझर शो चे आयोजन केले आहे. मात्र, काही पारंपरिक पद्धती या पर्यावरण पूरकमध्ये बसत त्याला अपवाद आहेत. गेल्या चार वर्षांपासून मंदिर समितीच्या वतीने होम मैदानावर धूळ होऊ नये यासाठी टॅंकरने पाण्याचा सडा आणि मॅट टाकण्यात येत आहे. यात्रेत स्वच्छतेला महत्त्व देण्यात येणार आहे. 
- डॉ. राजेंद्र घुली, संचालक, सिद्धेश्‍वर देवस्थान पंच कमिटी 

सिद्धेश्‍वर यात्रा पर्यावरणपूरक व्हावी यासाठी आम्ही गेल्या दोन वर्षांपासून प्रयत्न करत आहोत. त्याचाच भाग म्हणून यंदा सिद्धेश्‍वर यात्रेची सांगता दारूकामासोबत लेझर शोने करण्यात येणार आहे. हा लेझर शो होम मैदानावर पार पडणार आहे. 
बाळासाहेब पटणे, सिद्धेश्‍वर यात्रा कमिटी अध्यक्ष 

 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com