चव्हाण मोटार्सच्या सर्व्हिस सेंटरला आग 

परशुराम कोकणे
रविवार, 6 मे 2018

सोलापूर - होटगी रोड औद्योगिक वसाहतीमधील चव्हाण मोटार्सच्या सर्व्हिस सेंटरमध्ये शनिवारी आग लागून लाखोंचे नुकसान झाले. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले. आगीत नेमके किती नुकसान झाले हे तपासून कळविणार असल्याचे चव्हाण मोटार्सच्या व्यवस्थापनाने पोलिसांना सांगितले आहे. 

होटगी रस्त्यावर चव्हाण मोटार्स यांचे शोरूम आहे. तेथून काही अंतरावर आतमध्ये त्यांचे सर्व्हिस सेंटर आहे. औद्योगिक वसाहतीमधील या सर्व्हिस सेंटरमध्ये शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास आग लागली. काही कळायच्या आत धुराचे लोट बाहेर पडू लागले. कर्मचाऱ्यांची पळापळ झाली. या आठवड्यात सर्व्हिस सेंटरचे उद्‌घाटन होणार होते. त्यासाठी आतील बाजूस वेल्डिंग व इतर कामे चालू होती. वेल्डिंगची ठिणगी उडून आग लागल्याची चर्चा याठिकाणी होती. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचे अग्निशमन दलाचे प्रमुख केदार आवटे यांनी सांगितले. आग विझविण्यासाठी 19 बंब मागविण्यात आले. बघ्यांच्या गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमारही केला. दोन ते अडीच तास पाण्याचा मारा केल्यानंतर आग अटोक्‍यात आली. 

बाबू चव्हाण हे चव्हाण मोटार्सचे मालक असून ते परगावी गेले आहेत. व्यवस्थापकांसह इतर कर्मचारी व अधिकाऱ्यांनी आगीच्या घटनेमुळे धावपळ झाली. नगरसेवक तौफिक शेख, सोलापूर इलेक्‍ट्रॉनिक डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष खुशाल देढीया, सदस्य केतन शहा यांच्यासह अनेकांनी घटनास्थळी भेट दिली. आगीची माहिती कळताच सहायक पोलिस आयुक्त परशुराम पाटील, पोलिस निरीक्षक अरुण फुगे, सहायक पोलिस निरीक्षक अभिजित मोहिते, पोलिस उपनिरीक्षक देविदास करंडे यांच्यासह पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते.

Web Title: chavan motors service center fire loss