शिरोळच्या २४ तरुणांना गंडा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 ऑगस्ट 2018

शिरोळ - शासनाच्या वैद्यकीय विभागात क्‍लार्क व शिपाई पदाची नोकरी लावतो, म्हणून तरुणांना गंडा घालणाऱ्या टोळीने शिरोळ तालुक्‍यातील शिरोळ, अब्दुललाट, उदगाव, मौजे आगर येथील २४ तरुणांची ४९ लाख ३० हजार रुपयांची फसवणूक केली आहे. 

याबाबत शिरोली पोलिसांच्या अटकेत असलेल्या विजय विलास चव्हाण (रा. भैरेवाडी, ता. पन्हाळा), हेमंत हणमंत पाटील (रा. येडेमच्छिंद्र, ता. वाळवा), अधिकराव पाटील व बजरंग सुतार (दोघेही रा. ऐतवडे खुर्द, ता. वाळवा) व सचिन हिंदूराव पाटील (रा. वाटेगाव, ता. वाळवा) यांच्याविरोधात शिरोळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत शिरोळ पोलिस ठाण्यात अनिल मारुती माने (रा. मौजे आगर) यांनी फसवणुकीची फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, अरुण किसन चव्हाण (रा. मौजे आगर) यांच्या घरी मे २०१८ ते १५ ऑगस्ट २०१८ दरम्यान वेळोवेळी येऊन लोकांना शासनाच्या आरोग्य विभागात क्‍लार्क व शिपायाची नोकरी लावतो. 

क्‍लार्क पदाकरिता ७ लाख, तर शिपाई पदाकरिता ५ लाख रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. यापैकी सुरवातीस निम्मी रक्‍कम व नोकरीस रुजू झाल्यानंतर उर्वरित रक्‍कम द्यावी लागेल, असेही सांगितले. अनिल माने व चव्हाण यांना लोणावळा येथे नेऊन संशयित आरोपी सचिन पाटील हा मंत्रालयात सचिव स्तरावर अधिकार पदावर आहे, असे सांगून सचिनबरोबर भेट घालून दिली. अनिल माने व अरुण चव्हाण यांच्या मध्यस्तीने २४ तरुणांनी ४९ लाख ३० हजार रुपये दिले होते. या तरुणांचा तगादा मध्यस्थांकडे लागल्यानंतर या मध्यस्थांनी शिरोळ पोलिस ठाण्यात रविवारी रात्री पाच जणांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.

नियुक्‍तीची पत्रे 
शिरोळ, अब्दुललाट, मौजे आगर, उदगाव येथील तरुणांना नियुक्‍तीची पत्रे देण्यात आली आहेत. जिल्ह्यातील शाहूवाडी, गडहिंग्लज, हातकणंगले या ठिकाणच्या ग्रामीण रुग्णालयांत लिपिक, तसेच शिपाई या पदावर नियुक्‍ती करण्यात आली असल्याची नियुक्‍तीपत्रे आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनाचे सचिव यांच्या सहीने देण्यात आली आहेत. वेतन श्रेणीचीही रक्‍कम नियुक्‍तीपत्रामध्ये नमूद करण्यात आली आहे.

Web Title: Cheating Crime