आमदाराचा नातेवाईक असल्याचे भासवून पोलिस निरीक्षकालाच गंडा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 ऑगस्ट 2018

याबाबत शेवगांव पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक ओमासे यांच्या फिर्यादीवरुन शिवसंग्राम पक्षाचे तालुकाध्यक्ष नवनाथ हरिचंद्र इसारवाडे (राहणार - गदेवाडी ता. शेवगांव) यांच्या विरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

शेवगांव : आमदारांच्या जवळचा नातेवाईक असल्याचे भासवून शेवगांव पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक गोविंद ओमासे यांना सहा लाख २० हजार रुपयांना गंडा घालण्याचा धक्कादायक प्रकार शेवगांव येथे घडला.

याबाबत शेवगांव पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक ओमासे यांच्या फिर्यादीवरुन शिवसंग्राम पक्षाचे तालुकाध्यक्ष नवनाथ हरिचंद्र इसारवाडे (राहणार - गदेवाडी ता. शेवगांव) यांच्या विरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

ओमासे यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, इसारवाडे यांनी १० फेब्रुवारी २०१८ पासून ते ५ अॉगस्ट २०१८ या कालावधीत आमदार विनायक मेटे यांचा नातेवाईक आहे. तसेच त्यांनी स्थापन केलेल्या शिवसंग्राम संघटनेचा तालुकाध्यक्ष आहे. असे सांगत विश्वास संपादन केला. त्यानंतर मोबाईल (क्रमांक ९४२३२४९१९१) वर वेळोवेळी संपर्क करुन एका अज्ञात साथीदारांच्या मदतीने हुबेहुब आमदार विनायक मेटे यांच्या आवाजात वेगेवगेळ्या कारणासाठी पैशाची मागणी केली. साक्षीदाराकडून सहा लाख २० हजार रुपयांची रक्कम घेवून फसवणूक केली आहे. अशा फिर्यादीवरुन शेवगांव पोलिस ठाण्यात इसारवाडे व एका अज्ञात इसमाविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन मगर हे करीत आहेत. 

Web Title: cheating to police in Shevgaon