esakal | राज्याच्या आरोग्य सल्लागारांकडून सांगलीतील तालुक्यांची पाहणी
sakal

बोलून बातमी शोधा

राज्याच्या आरोग्य सल्लागारांकडून सांगलीतील तालुक्यांची पाहणी

राज्याच्या आरोग्य सल्लागारांकडून सांगलीतील तालुक्यांची पाहणी

sakal_logo
By
अजित झळके

सांगली : जिल्ह्यातील (sangli district) वाढत्या कोरोना प्रादुर्भाव संदर्भात पाहणी करण्यासाठी राज्याच्या आरोग्य विभागाचे सल्लागार डॉ. सुभाष साळुंखे (subhash salunkhe) हे आज जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. त्यांनी अधिक प्रादुर्भाव असलेल्या वाळवा, पलूस आणि कडेगाव या तीन तालुक्यांची आज पाहणी केली. डॉ. सुभाष साळुंखे हे राज्याचे आरोग्य महासंचालक म्हणून निवृत्त झाले असून त्यांनी दीर्घकाळ जागतिक आरोग्य संघटने (WHO) सोबत काम केलेले आहे. राज्यातील बहुसंख्य जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात येत असताना जिल्ह्यातील कोरोना रुग्णवाढ अद्याप कायम आहे.

परिस्थिती नियंत्रणात येण्यासाठी खटाटोप करूनही आकडेवारी कमी होत नसल्यामुळे चिंता वाढली आहे. त्या पार्श्वभूमीवर डॉ. साळुंखे यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जातोय. वाळवा, पलूस आणि कडेगाव या तीन तालुक्यांमध्ये गेल्या महिनाभरात कृष्णा (krushna election) साखर कारखान्याच्या निवडणुकीचा धुरळा उडाला होता. त्यामुळे तेथे रुग्ण संख्या सातत्याने वाढल्याचे दिसून आले. त्यामुळे डॉ. साळुंखे यांनी तेथील परिस्थितीचा प्राधान्याने आढावा घेतला. तपासण्या, संपर्क शोध, विलगीकरण याबाबत आरोग्य विभागाला काही विशेष सूचना केल्या. कोरोनाचे नोडल ऑफिसर डॉ. संजय साळुंखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद पोरे हे या दौर्‍यात सहभागी झाले आहेत.

हेही वाचा: सांगलीत बंद विरोधात व्यापारी संघटनांचे भीक मांगो आंदोलन

उद्या डॉक्टर साळुंखे हे मिरज तालुक्यासह महापालिका क्षेत्रात पाहणी करतील. महापालिका, जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागाशी संवाद साधतील. कोरोना रूग्णालयाला भेट देतील आणि तेथील व्यवस्थेची पाहणी करतील, असे सांगण्यात आले.

loading image