राळेगणसिद्धीकर म्हणाले, केजरीवाल "आप'लेच 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 फेब्रुवारी 2020

राळेगणसिद्धी ः दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने मिळविलेल्या विजयाचा येथील केजरीवाल समर्थकांनी आज फटाके वाजवून व एकमेकांना पेढे भरवून आनंद साजरा केला. अरविंद केजरीवाल झिंदाबाद, आम आदमी पक्षाचा विजय असो, अशा घोषणा दिल्या. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी अरविंद केजरीवाल यांना अनेकदा राजकारणात गेल्याने फटकारले होते. मात्र, राळेगणसिद्धीकरांनी त्यांचा विजय आपलाच मानून जल्लोष केला.

फटाके वाजले, पेढ्यांचेही वाटप

माजी सरपंच जयसिंग मापारी, दत्ता आवारी, रामहरी भोसले, निळकंठ नवले, दासू पोटे यांच्यासह समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अरविंद केजरीवाल यांचे समर्थक सकाळपासूनच टीव्ही, मोबाईल आदींच्या माध्यमातून दिल्लीतील निकालावर लक्ष ठेवून होते. केजरीवाल यांनी आघाडी घेतल्याचे लक्षात आल्यानंतर लगेचच कार्यकर्त्यानी फटाके वाजवत व पेढे भरवत आनंद साजरा केला. 

हेही वाचा - इंदोरीकर महाराजांमागे पोलिसांचे झेंगाट

अण्णांचा प्रतिक्रियेस नकार! 
दरम्यान, दिल्लीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे सरकार पुन्हा सत्तेवर येणार असल्याबाबत प्रतिक्रिया विचारली असता, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मौन पाळले. सध्या "निर्भया'च्या गुन्हेगारांना फाशी होईपर्यंत मौन आंदोलन करत असलेले अण्णा विविध विषयांवर लेखी चर्चा करतात. मात्र, केजरीवाल यांच्या विजयाबद्दल कोणतीही प्रतिक्रिया देण्यास त्यांनी नकार दिला. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cheers of Delhi victory at Raleganshidhi