
-विष्णू मोहिते
सांगली : केंद्र सरकार सेंद्रिय, नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देत आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून विविध योजना राबवित असले तरीही रासायनिक खतांचे उत्पादन आणि वापर कमी होताना दिसत नाही. सांगली जिल्ह्यात सेंद्रिय व नैसर्गिक शेती केवळ सहा हजार हेक्टरवर केली जाते.