महापौरांविरोधात मुख्यमंत्र्यांचा तीळपापड

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 नोव्हेंबर 2016

बेळगाव - महापौर सरिता पाटील यांनी मुंबई महापौरांची भेट घेतल्यामुळे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा तीळपापड झाला आहे. या भेटीमुळे मुख्यमंत्र्यांनी नगरविकासमंत्री रोशन बेग यांच्यासमोर आपली नाराजी व्यक्त केली आहे. शिवाय महापौर व उपमहापौरांवरील कारवाईबाबत रात्री होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्याचे त्यांनी नक्की केले आहे.

नगरविकास मंत्री रोशन बेग यांनी बुधवारी नगरसेवकांना ही माहिती दिली.
संभाव्य महापालिका बरखास्तीच्या कारवाईविरोधात सर्वभाषिक 44 नगरसेवकांनी बुधवारी सुवर्णसौध येथे नगरविकास मंत्र्यांची भेट घेतली.

त्या वेळी नगरविकास मंत्र्यांनी नगरसेवकांची बैठक घेऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. पण अखेरीस महापौरांच्या मुंबई दौऱ्याबाबत नाराजी व्यक्त केली. महापौरांनी मुंबईच्या महापौरांची भेट घेऊन कर्नाटक शासनाने पाठविलेल्या नोटिसीबाबतची माहिती दिली होती. त्या वेळी अखिल भारतीय महापौर परिषदेत हा मुद्दा उपस्थित करण्याची ग्वाही मुंबईच्या महापौरांनी बेळगावच्या महापौर सरिता पाटील यांना दिली होती. या वेळी उपमहापौर संजय शिंदे, सत्ताधारी गटनेते पंढरी परब व सत्ताधारी गटातील अन्य नगरसेवक त्यांच्यासोबत होते. या भेटीची माहिती कन्नड व इंग्रजी दैनिकांनी ठळकपणे प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे त्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. यासंदर्भात बुधवारी सकाळीच मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याशी चर्चा झाल्याचे रोशन बेग यांनी नगरसेवकांना सांगितले.

या वेळी नगरसेवक दीपक जमखंडी यांनी नगरसेवकांची बाजू मांडली. महापालिकेतील सर्व मराठी, कन्नड व उर्दू नगरसेवक एक आहेत. गेल्या अडीच वर्षात अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. सर्वाधिक घरपट्टी वसूल केली आहे. महापालिकेच्या कोट्यवधी रुपये किमतीच्या मिळकती परत मिळविल्या आहेत. त्यामुळे शासनाकडून केवळ महापौर व उपमहापौरांवर कारवाई व्हावी, महापालिका बरखास्त केली तर सर्व नगरसेवकांवर अन्याय होईल, अशी भूमिकाही जमखंडी यांनी व्यक्त केली. नगरसेवक दीपक जमखंडी, सरला हेरेकर यांनीही बरखास्तीच्या संभाव्य कारवाईला विरोध केला. या वेळी सत्ताधारी व समविचारी गटातील मराठी तसेच विरोधी गटातील कन्नड व उर्दू नगरसेवक उपस्थित होते.

कर्नाटकाविरोधात कृत्य खपवून घेणार नाही
सरिता पाटील यांनी मुंबईच्या महापौरांची भेट घेऊन कर्नाटकविरोधात तक्रार करणे योग्य नसल्याचे मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले आहे. बुधवारी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत कारवाईबाबत अंतिम निर्णय घेण्याचे सुतोवाच केले आहे. बेळगाव हे कर्नाटकाचेच आहे, त्यामुळे कर्नाटकाविरोधात कोणतेही कृत्य खपवून घेतले जाणार नाही, असे रोशन बेग म्हणाले.

Web Title: Chief Minister confuse to mayor oppose