आरक्षण विरोधात याचिका स्पॉन्सर्ड  - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अजित झळके
रविवार, 23 डिसेंबर 2018

सांगली - मराठा व ओबीसी समाजामध्ये भांडणे लावण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जात आहे. आरक्षण विरोधातील याचिका या स्पॉन्सर्ड याचिका आहेत, असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. 

सांगली - मराठा व ओबीसी समाजामध्ये भांडणे लावण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जात आहे. आरक्षण विरोधातील याचिका या स्पॉन्सर्ड याचिका आहेत, असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. 

नागज राष्ट्रीय महामार्ग कोनशिला कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. मराठा आरक्षणाबाबत विरोधकांकडून ओबोसी समाजास चुकीचे सांगितले जात आहे. पण ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का लागू देणार नाही असे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले.,

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, धनगर समाजास एनटीमधून आरक्षण सध्या आहे पण या समाजास एसटीमध्ये आरक्षण हवे आहे ते देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण या प्रश्‍नावरही विरोधक आदिवासींना भडकवण्याचे प्रयत्न करत आहेत. धनगर समाजास आरक्षण देताना आदिवासींवर कोणतेही गंडातर येणार नाही असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. 

Web Title: Chief Minister Devandra Phadanvis comment