ब्रह्मनाळमधील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 ऑगस्ट 2019

कोल्हापूर - ब्रह्मनाळ येथील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची मदत देण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. 

कोल्हापूर - ब्रह्मनाळ येथील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची मदत देण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. 

कोल्हापूर येथे आज पुरस्थितीचा आढावा घेण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी ही घोषणा केली. दरम्यान सामाजिक न्यायमंत्री सुरेश खाडे यांनी पुरग्रस्तांना दहा हजारांची मदत जाहीर केली असल्याची माहिती सांगली येथे दिली आहे. 

महसूल मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले,  राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाची ८ पथके कार्यरत असून एकूण २४ बोटींद्वारे बचावकार्य सुरू आहे. या ८ पथकांतील २१९ जवान मिरज आणि पलूस तालुक्यात मदत व बचाव कार्य करत आहे. या १२ पथकांचे एकूण ३०३ जवान २९ बोटींद्वारे इस्लामपूर - वाळवा, मिरज, पलूस या तालुक्यात बचाव कार्य करत आहेत. याशिवाय महसूल विभाग आणि जिल्हा परिषदेच्या १० बोटींद्वारे बचाव कार्य सुरू आहे.असेही श्री पाटील यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chief Minister Devendra Fadnavis declares 5 lakh help