मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापुरात दाखल 

परशुराम कोकणे
गुरुवार, 11 जुलै 2019

-  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज गुरुवारी दुपारी दीड वाजता विमानाने सोलापुरात दाखल झाले.

- महापौर शोभा बनशेट्टी, पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे स्वागत केले.

- प्रहार संघटनेसह विविध संस्थांच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

सोलापूर :  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज गुरुवारी दुपारी दीड वाजता विमानाने सोलापुरात दाखल झाले. महापौर शोभा बनशेट्टी, पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे स्वागत केले.

मुख्यमंत्र्यांसोबत अमृता फडणवीस याही आल्या आहेत. यावेळी सहकार मंत्री सुभाष देशमुख, गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, आमदार सिद्धाराम म्हेत्रे, माजी आमदार सिद्रामप्पा पाटील, आमदार भारत भालके, शिवसेना जिल्हाप्रमुख महेश कोठे, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, भाजपा जिल्हाध्यक्ष शहाजी पवार आदी उपस्थित होते.

प्रहार संघटनेसह विविध संस्थांच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

दुपारी २ वाजता पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारत आणि परीक्षा भवन इमारतीचा पायाभरणी समारंभ मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते होईल. दुपारी अडीच वाजता पंतप्रधान आवास योजनेंतर्गत सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या गृहसंकुलाचे भूमिपूजन पत्रकार भवन येथे त्यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर दुपारी चार वाजता ते हेलिकॉप्टरने बोरगाव (ता. माळशिरस) येथे ते जाणार आहे. 

त्यानंतर सायंकाळी पाच वाजता पंढरपूर येथे 'कृषी महोत्सव 2019' चे त्यांच्या हस्ते उद्‌घाटन होईल. सायंकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी वारी-नारीशक्ती या चित्ररथाच्या उपक्रमाचा समोराप त्यांच्या हस्ते होईल. सहा वाजून चाळीस मिनिटांनी पर्यावरणाची वारी, पंढरीच्या दारी या उपक्रमाचा समारोप होईल. सात वाजून दहा मिनिटांनी नमामी चंद्रभागाच्या लघुपटाचे उद्‌घाटन होईल. शुक्रवारी (ता. 12) पहाटे दोन वाजून वीस मिनिटांनी त्यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्‍मीणीची शासकीय महापूजा होईल. सकाळी नऊ वाजून चाळीस मिनिटांनी सोलापूरकडे हेलिकॉप्टरने येतील. सकाळी दहा वाजता सोलापूर विमानतळावरुन ते मुंबईला रवाना होणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chief Minister Devendra Phadanvis At Solapur