मुख्यमंत्री म्हणाले, कागलचे भावी आमदार समरजितसिंहच !

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 सप्टेंबर 2019

बिद्री - कागलच्या आमदारांना १५ वर्षांत सत्ता असतानाही जे जमले नाही, ते समरजितसिंह घाटगे यांनी आमदार नसतानाही करून दाखवले आहे. त्यामुळे आगामी विधानसभेत कागल मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार म्हणून शाहू महाराजांच्या जनक घराण्याचे समरजितसिंहच असतील, अशी जाहीर घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. 

बिद्री - कागलच्या आमदारांना १५ वर्षांत सत्ता असतानाही जे जमले नाही, ते समरजितसिंह घाटगे यांनी आमदार नसतानाही करून दाखवले आहे. त्यामुळे आगामी विधानसभेत कागल मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार म्हणून शाहू महाराजांच्या जनक घराण्याचे समरजितसिंहच असतील, अशी जाहीर घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. 

भाजपची महाजनादेश यात्रा बिद्री (ता. कागल) येथे आली. त्यावेळी जनसमुदायासमोर ते बोलत होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘येथे महाजनादेश यात्रेला दोन-तीनशे लोक उपस्थित राहून एक-दोन हार घालून माझे स्वागत होईल, असे वाटले होते; पण येथे जनसागर लोटला. आता कोणतीही शंकाकुशंका उपस्थित करू नका. ‘आमचं ठरलंय’ शाहू महाराजांचे जनक घराणे असणाऱ्या समरजितराजेंना कागलची जबाबदारी मिळणार आहे.’

हेही वाचा Vidha Sabha 2019 : काँग्रेसच्या पहिल्या यादीत पी. एन., ऋतुराज पाटील यांना उमेदवारीची शक्यता 

ते म्हणाले, ‘आपण जनतेला उत्तरदायी आहे, असे आमचे नेते नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे. आपण जेव्हा विरोधी पक्षात असतो, तेव्हा संघर्षाची यात्रा असते. आपण जेव्हा सत्तेत असतो, तेव्हा कल्याणाची यात्रा असते. ही संवादाची यात्रा आहे. ’  प्रदेश उपाध्यक्ष धनंजय महाडिक यांनीही मनोगत 
व्यक्त केले. 

यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, विठ्ठलराव खोराटे, संचालक बाबासाहेब पाटील, दत्तामामा खराडे, सुनीलराज सूर्यवंशी, भाजप तालुकाध्यक्ष संजय पाटील, एम. पी. पाटील, भूषण पाटील आदी उपस्थित होते.

परिवर्तन अटळ - घाटगे
समरजितसिंह घाटगे म्हणाले, ‘‘मुख्यमंत्रीसाहेब, मंत्री चंद्रकांत पाटील आणि आम्ही केलेल्या कामामुळे कागलमध्ये परिवर्तन अटळ आहे. ही निवडणूक कागलच्या जनतेने हातात घेतली आहे. माझी युती कागलच्या जनतेबरोबर झाली आहे. त्यामुळे मला एक संधी द्या. शाश्वत विकासाचे ज्वलंत उदाहरण म्हणून कागल विधानसभा मतदारसंघाला पुढे आणू.’’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chief Minister says Samarjeetsingh Ghatge next MLA of Kagal