दूध दरवाढीचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी आजच घ्यावा, अन्यथा आंदोलन तीव्र

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 जुलै 2018

राहुरी फॅक्टरी - दूध दरवाढीचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी आजच घ्यावा. अन्यथा आंदोलनाची धार तीव्र होईल. त्यास, सरकार जबाबदार असेल. असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नगर (उत्तर) जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांनी दिला. 

आज (गुरुवारी) सकाळी अकरा वाजता स्वाभिमानी शेतकरी संघटने तर्फे राहुरी बाजार समिती समोर नगर-मनमाड मार्गावर वीस मिनिटे रस्ता रोको झाला. यावेळी मोरे बोलत होते. शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, मनसे, रिपाईं च्या कार्यकर्त्यांनी भाग घेऊन, आंदोलनास पाठींबा दिला.

शिवसेनेचे उत्तर जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे म्हणाले, "शिवसेना सत्तेत असली. तरी, शेतकरी हिताची भूमिका कायम असल्याने शिवसैनिक या आंदोलनात शेतकऱ्यांबरोबर आहेत." स्वाभिमानी युवकचे तालुकाध्यक्ष प्रकाश देठे, राष्ट्रवादीचे बाळासाहेब उंडे, रिपाईंचे बाळासाहेब जाधव यांची भाषणे झाली. सरकारच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. नंदकुमार गागरे, ज्ञानेश्वर गाडे, दिनेश वराळे, अरुण डौले, सुनील इंगळे, प्रताप जाधव, सतीश पवार, अनिल इंगळे, अशोक कदम, दिनेश वराळे, अमोल मोढे, विशाल तारडे, विजय ढोकणे उपस्थित होते. आंदोलनस्थळी पोलिस बंदोबस्तासह राज्य राखीव दलाची तुकडी तैनात होती. तहलीलदार अनिल दौंडे यांनी निवेदन स्विकारले.

Web Title: The Chief Minister should decide the milk price today, otherwise the agitation will be aggressive