इस्लामपूर : प्रशासक वैभव साबळे 'ऍक्शन मोड'मध्ये; शहर सौंदर्यीकरणावर भर | Chief Vaibhav Sabale | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chief Vaibhav Sabale

इस्लामपूर : प्रशासक वैभव साबळे 'ऍक्शन मोड'मध्ये; शहर सौंदर्यीकरणावर भर

इस्लामपूर (जिल्हा सांगली) : प्रशासक म्हणून जबाबदारी हाती घेताच मुख्याधिकारी वैभव साबळे (Vaibhav Sabale) यांनी शहर सौंदर्यीकरणावर भर देण्याचे सुतोवाच केले आहे. तशा प्रकारची जाहीर सुचना नागरिकांसाठी जारी केली आहे. संपूर्ण शहरभर अस्ताव्यस्त अवस्थेत झळकणारे डिजिटल काढून टाकण्याबरोबरच अतिक्रमणही काढण्यावर त्यांचा भर आहे. १० जानेवारीपासून ही मोहीम राबविण्यात येणार आहे. प्रशासकांच्या या 'ऍक्शन मोड'ची शहरात चर्चा आहे. (Sangali District Marathi News)

शहरातील व्यापारी, नागरिक यांना श्री. साबळे यांनी सहकार्याचे आवाहन केले आहे. १० जानेवारीपासून प्लास्टिक जप्ती मोहीम राबवली जाणार आहे. सार्वजनिक ठिकाणी विकृतीकरण करण्यापासून रोखले जाईल. अनधिकृत जाहिराती, घोषणाफलक, होर्डिंग, पोस्टर्स काढून टाकण्यात येणार आहेत. सार्वजनिक रस्ते, फुटपाथ, नगरपरिषद मालकीच्या जागा, रस्त्याकडेच्या गटारांवर अतिक्रमण करून करण्यात आलेले अनधिकृत बांधकाम हटविण्यात येणार आहे. रस्त्याकडेला बंद अवस्थेत पडून असलेल्या गाड्या तसेच रस्त्यावर पडून असलेले आणि लोकांना वाहतुकीत अडथळा ठरणारे बांधकाम साहित्यही काढले जाणार आहे.

हेही वाचा: ‘वीर गाथा’ राष्ट्रीय स्पर्धेत पुण्यातील आरिव चौथ्या क्रमांकावर

याबाबत मुख्याधिकारी वैभव साबळे म्हणाले, "शहराचे विद्रुपीकरण थांबवणे व शहर सौंदर्यीकरण करण्यासाठी याची अंमलबजावणी आवश्यक आहे. शहराच्या विकासात भर घालण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे. आपले अतिक्रमण असल्यास ९ जानेवारी पर्यंत काढून घ्यावे. याबाबतीत सहकार्य न करणाऱ्यांच्या विरोधात दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. कठोर कारवाईची वेळ येऊ देऊ नये."

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :SangliIslampur
loading image
go to top