चिक्कोडी : रात्री दुकानाला आग लागून आगीत ५ लाखाचे नुकसान

शॉर्टसर्किटमुळे रात्री रौद्ररूप : स्टेशनरीसह इलेक्ट्रॉनिक साहित्य खाक
Chikkodi fire broke out shop night caused loss Rs 5 lakh
Chikkodi fire broke out shop night caused loss Rs 5 lakhsakal

चिक्कोडी : शहरातील स्टेशनरी दुकानाला अचानक शॉर्टसर्किटने आग लागली. मंगळवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास ही घडली. रात्री दुकानाला लागलेल्या आगीने रौद्ररूप धारण केले होते. त्यात जळून सुमारे ५ लाखाचे स्टेशनरी व इलेक्ट्रॉनिक साहित्य खाक झाले.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, शहरात एसबीआय बँकेच्या समोर कृष्णा चौकाजवळ अमित शिवानंद मुसंडी यांचे महाकोटेश्वरी हे इलेक्ट्रॉनिक व अन्य साहित्याचे दुकान आहे. दुकानाच्या मागेच त्यांचे घर देखील आहे. मंगळवारी सायंकाळी वळीव पावसाने झोडपले. त्यामुळे लवकरच दुकान बंद करून ते गेले होते. मात्र साडेअकरा वाजण्याच्या सुमारास दुकानात शॉर्टसर्किटमुळे आग लागली. यावेळी बघता-बघता आगीने रौद्ररूप धारण केले होते. दुकानात एक लॅपटॉप, एक कॅमेरा, पाच झेरॉक्स मशीन, एलईडी टीव्ही, पुस्तके, वह्या तसेच विविध स्टेशनरी साहित्यासह एकूण पाच लाखाचे साहित्य जळून नुकसान झाले. दुकानाच्या मागे असलेल्या मालकांना आग लागल्याची माहिती दिल्यानंतर घरातील लोक भयभीत होऊन मागील दरवाजातून बाहेर पडले. घराला देखील आग लागण्याची शक्यता असल्याने घटनास्थळी अग्निशमन दलाने धाव घेतली. त्यांनी त्वरित पाण्याचे फवारे मारुन आग आटोक्यात आणले. त्यामुळे त्यांचे घर शाबूत राहून इतर नुकसान टळले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com