चिक्कोडी तालुक्यातील पूरग्रस्तांना चिंता : उत्पादन घटण्याची भीती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 येथील महापुरात बुडालेला ऊस

चिक्कोडी तालुक्यातील पूरग्रस्तांना चिंता; उत्पादन घटण्याची भीती

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

चिक्कोडी : नदीकाठावरील ऊस पावसाळ्यात आलेल्या महापुरामुळे अनेक दिवसांपासून पाण्यात बुडालेला होता. ऊस योग्य वेळेत साखर कारखानदार घेऊन जात नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. त्यामुळे पूरबाधित उसाची तोड कधी होणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पाण्यात बुडालेला ऊस दररोज वाळत चालल्याने उत्पादन कमी होण्याची भीती शेतकऱ्यांसमोर आहे. त्यामुळे चिंतेत असलेला नदीकाठावरील शेतकरी ऊस पाठविण्यासाठी धडपडत आहे. पण कारखानदार त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र दिसत आहे.

दरवर्षी सीमाभागातील कृष्णा, दूधगंगा, वेदगंगा, पंचगंगा, चिकोत्रा नद्यांच्या काठावरील शेतकऱ्यांना ही समस्या निर्माण होत आहे. यंदाही दोन-तीन वेळा महापूर आल्याने ऊस पीक पाण्यातच राहिले आहे. चिक्कोडी, निपाणी तालुक्यातील नदी काठावरील अंदाजे 10 हजार 800 हेक्‍टर ऊस पीक बुडाले आहे. कारखान्याला हा ऊस पाठविताना अनेक समस्या निर्माण होत आहेत.

हेही वाचा: कोथरुड : चांदणी चौकातील वाहतूक समस्येवर तोडगा कधी निघणार

10 हजार 800 हेक्टरवरील ऊस बुडाला

चिक्कोडी, निपाणी तालुक्यात कृष्णा, दूधगंगा, वेदगंगा, पंचगंगा, चिकोत्रा अशा पाच नद्या आहेत. यंदा झालेला पाऊस, महापुरामुळे ऊस, सोयाबीन, मक्का, भुईमूगासह 17 हजार 59 हेक्टर पीक पाण्याखाली जाऊन नुकसान झाले आहे. यामध्ये 10 हजार 800 हेक्टर उसाचा समावेश आहे. कारखानदार दरवर्षी नदीकाठावरील उसाला प्रथम प्राधान्य देत होते. पण यंदा हा ऊस महापुरात बुडून नुकसान झाल्याने त्याकडे दुर्लक्ष होत आहे.

`जुलैच्या शेवटच्या आठवड्यात महापूर आल्याने तीन महिने उसाच्या शेतात पाणी साचून राहिले. कारखान्यांनी उसाची तोड करून शेतकऱ्यांच्या मदतीला धावून यावे.`

- महादेव माळी, शेतकरी, एकसंबा

loading image
go to top