चांदणी चौकातील वाहतूक समस्येवर तोडगा कधी निघणार | Kothrud | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चांदणी चौक ते बावधन रस्त्यावर पडलेले खड्डे अजूनही बुजवले गेले नाहीत

कोथरुड : चांदणी चौकातील वाहतूक समस्येवर तोडगा कधी निघणार

कोथरुड : पुण्याचे पश्चिम प्रवेशव्दार म्हणून ओळखल्या जाणा-या चांदणीचौकात गेली दोन वर्षे उड्डाणपुलाचे काम सुरु आहे. राज्य महामार्गाच्यावतीने चांदणी चौक ते कोकण रस्त्याच्या रुंदीकरणाचे व काँक्रीट रस्त्याचे काम सुरु आहे. परंतु या कामात योग्य नियोजन नसल्याने वाहनचालक व परिसरातील रहीवाशांना त्याचा त्रास सोसावा लागत आहे. या समस्येवर तातडीने तोडगा काढावा अशी मागणी होत आहे.

बावधनच्या ग्लोरीया सोसायटीतील रहीवाशी असलेले मिलिंद काकिर्डे म्हणाले की, दीड वर्षापूर्वी मनपाने येथील रस्त्यावर असलेले पथ दिवे काढून टाकले. पर्यायी व्यवस्था नसल्यामुळे रात्रीच्या वेळी घराकडे पायी जाणारे कामगार, प्रवासी, दुचाकीवरुन जाणारे वाहन चालक यांची त्यामुळे खुप तारांबळ होते. अंधारात जीव वाचवत चालणे धोकेदायक व भयावह आहे. अचानक वेगाने येणारे वाहन उडवून जाईल की काय याची भिती वाटत असते. रस्ता अतिशय अरुंद असल्याने जीव मुठीत घेवून चालावे लागते. चांदणी चौकाला जोडणा-या रस्त्यांवर मोठे खड्डे पडले आहेत. वारंवार तक्रार करुनही ते बुजवले जात नाहीत. यासंदर्भात मनपाकडे वारंवार तक्रार केली परंतु हे काम कंत्राटदाराकडे आहे असे सांगत मनपाने दुर्लक्ष केले आहे.

हेही वाचा: लसीकरणासाठी टिमवर्क म्हणून काम करा जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस

भूगाव येथील रहीवाशी लक्ष्मण चव्हाण म्हणाले की, बावधन, भूगाव, भुकूम आणि पुढे राहणा-या लोकांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार असून यामध्ये कोणाशी संवाद करायचा हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना येतो. राज्य रस्ते मार्गावर नविन काँक्रेटीकरणाचे काम जेथे सुरु आहे तेथे खड्डे पडले आहेत. ते कोणी बुजवायचे याबद्दल पुणे महानगरपालिका सार्वजनिक बांधकाम विभाग व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांनी स्पष्टीकरण देणे गरजेचे आहे. चांदणी चौकातील वाहतूक प्रश्नाबाबत भाजपा प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांनी स्वतः लक्ष घालून योग्य त्या सुधारणा करण्यासंदर्भात सुचना दिल्या होत्या. परंतु अजूनही त्याबद्दल कार्यवाही झाल्याचे दिसत नाही.

loading image
go to top