Chikodi : सदलग्यात १६ लाखांच्या साड्या पकडल्या ; चेकपोस्टवर कारवाई

रायबाग मतदारसंघात वाटपासाठी जाताना कारवाई
Crime News
Crime Newssakal

चिक्कोडी : निवडणूक घोषणेआधीच चेकपोस्ट तयार करून कडक तपासणी सुरू केली असताना काल (ता. २१) रात्री सदलगा-दत्तवाड चेकपोस्टवर १६ लाखांच्या साड्या पकडण्यात आल्या.

रायबाग मतदारसंघात त्या वाटपासाठी नेण्यात येत असल्याचे उघड झाले असून, या प्रकरणी दोघांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणूकआधीच ही मोठी कारवाई मानली जात आहे.

खदीर दावरअली शेख (वय ६०, रा. हुंकार कॉलनी, मणेरमळा उचगाव, ता. करवीर, जि. कोल्हापूर) आणि वसंत राजव्वा कांबळे (५०, रा. ब्याकtड, ता. रायबाग) अशी ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे आहेत. यापैकी शेख हा चालक आहे

याबाबत माहिती अशी ः काल रात्री बारानंतर दत्तवाडकडून टेम्पो आला. चेकपोस्टवर बंदोबस्तासाठी असलेल्या कर्मचारी व अधिकाऱ्यांनी त्याला अडविले. त्या वाहनात असलेल्या चालक व अन्य एका व्यक्तीकडे विचारणा केली. पूर्ण टेम्पो भरून प्लास्टिक पोती दिसून आली. त्यामध्ये काढून पाहिल्यानंतर साड्यांचे गठ्ठे आढळले. याबाबत त्या दोघांकडे कागदपत्रांची माहिती मागितली असता सादर करता आली नाही.

त्यामुळे सर्व गठ्ठे तपासून वरिष्ठांना याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी धाव घेऊन ऐवज ताब्यात घेतला. त्यावेळी त्या वाहनात तब्बल ५ हजार साड्या आढळल्या. प्रत्येक साडीची किंमत ३२० रूपये धरून अंदाजे किंमत १६ लाख रूपये होत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तर त्याच्या वाहतुकीसाठी वापरेली मोटार अंदाजे ३ लाखाची धरून १९ लाखांचा ऐवज पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

चिक्कोडी-सदलगा मतदारसंघात तीन ठिकाणी चेकपोस्ट सुरू केले असून कडक तपासणी सुरू आहे. चेकपोस्ट सुरू झाल्यानंतर चिक्कोडीजवळ चेकपोस्टवर बेकायदेशीर वाहतुकीची दारू पकडली होती. त्यानंतर आता ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. सदलगा पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती उपनिरीक्षक भरतगौडा यांनी दिली.

रायबागमध्ये वाटपासाठी...

रायबाग मतदारसंघात अलीकडेच मोठी वाहने उभी करून साड्या वाटप केल्याची चर्चा होती. आता सदलगामध्ये पकडलेली टेम्पो भरून साडी रायबाग मतदारसंघात वाटपासाठी जात असल्याचे चेकपोस्टवरील कर्मचाऱ्यांसमोर दोघांपैकी एकाने कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे या साड्या निवडणुकीसाठी आमिष म्हणून वाटपासाठी जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पिरनवाडी चेकपोस्टवर २.८९ लाख जप्त

बेळगाव, ता. २२ : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेनुसार प्रशासनाने बेकायदेशीर अवैध कारवाईविरोधात धडक मोहीम चालविली आहे. या मोहिमेंतर्गत येथील पिरनवाडी चेकपोस्टवर भरारी पथकाने आज २.८९ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. चेकपोस्टवरून जाणाऱ्या मोटारीला पोलिसांनी अडविले. या वेळी पथकातील अधिकाऱ्यांनी मोटारीची तपासणी केली असता २.८९ लाख रुपयांची रोख रक्कम सापडली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com