
बारावी परीक्षेची तयारी पूर्ण झाली आहे. गुरुवार (ता. ९) पासून २९ मार्चअखेर या परीक्षा चालतील.
Chikodi HSC Exam : परीक्षेची तयारी पूर्ण, यंदा ३१ हजार ५५१ विद्यार्थी
चिक्कोडी - बारावी परीक्षेची तयारी पूर्ण झाली आहे. गुरुवार (ता. ९)पासून २९ मार्चअखेर या परीक्षा चालतील. चिक्कोडी शैक्षणिक जिल्ह्यात शिक्षण खात्याने सर्व तयारी पूर्ण केली असून, ५३ केंद्रांचे नियोजन केले. या विभागात ३१ हजार ५५१ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.
जिल्ह्यात बारावी परीक्षेसाठी आवश्यक उपाययोजना केल्या आहेत. प्रश्नपत्रिका व उत्तर पत्रिका यांची ने-आण करण्यासाठी १५ वाहनांची सोय करण्यात आली आहे. पोलिस बंदोबस्ताचीही व्यवस्था करण्यासाठी नियोजन झाले आहे. त्यासाठी शिक्षण अधिकाऱ्यांच्या बैठक घेण्यात येत आहेत. सोमवारी बारावी परीक्षांच्या नियोजनासाठी बैठक घेण्यात आली. त्यात पुन्हा एकदा केंद्रनिहाय आढावा घेण्यात आला.

बेळगाव व चिक्कोडी शैक्षणिक जिल्ह्यात एकूण ९५ केंद्रे तयार केली आहेत. परीक्षा केंद्राच्या २०० मीटर परिसरात प्रवेश बंदी केली आहे. स्ट्राँगरूमसाठी २४ तास बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. परीक्षेसाठी नियुक्त अधिकाऱ्यांना बायोमेट्रिक हजेरी ८ ला द्यावी लागणार आहे. परीक्षा काळात केंद्रात तपासणीसाठी तहसीलदार, गटशिक्षणाधिकारी, प्राचार्य यांची नियुक्ती करण्यात आली आहे. परीक्षा केंद्रांवर पाणी, स्वच्छतागृह यांची व्यवस्था करण्यात आली आहे.
परीक्षेचे वेळापत्रक
तारीख (मार्च) विषय
९ - कन्नड
११ - गणित शिक्षण
१३ - अर्थशास्त्र
१४ - मानसशास्त्र, रसायनशास्त्र, सामान्य गणित
१५ - मराठी, ऊर्दू
१६ - बिझनेस स्टडीज
१७ - इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी
१८ - भूगोल, जीवशास्त्र
२० - इतिहास, भौतिकशास्त्र
२१ - हिंदी
२३ - इंग्रजी
२५ - राज्यशास्त्र, स्टॅटस्टिक
२७ - ऐच्छिक कन्नड, अकाऊंट, भूगर्भशास्त्र
२९ - समाजशास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स, कम्प्युटर सायन्स