अजब कारभार; फ्रीजमध्ये ठेवलेली लस टोचल्याने बालकांचा मृत्यू

बोचबाळ (ता.रामदुर्ग) येथील तीन बालकांचा बळी आरोग्य खात्यातील कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे गेल्याचे पुढे येत आहे.
vaccine
vaccinesakal
Updated on: 

बेळगाव : बोचबाळ (ता.रामदुर्ग) येथील तीन बालकांचा बळी आरोग्य खात्यातील कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे गेल्याचे पुढे येत आहे. लस कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवण्याऐवजी एका हॉटेलमधील फ्रीजमध्ये ठेवण्यात आली होती. परिणामी लसीची कोल्डचेन मेंटेन झाली नाही. ती लस दुसरे दिवशी मुलांना टोचण्यात आली तसेच लस कोल्ड स्टोरेज मार्गसुचीचे उल्लंघन झाल्याने बालकांचा मृत्यू (Child Death) झाल्याची माहिती जिल्हा लसीकरण (Vaccination) अधिकारी डॉ. ईश्वर गडाद यांनी दिली.

सोमवार (ता.१७) याबाबत बेळगावात जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. ईश्वर गडाद यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, सालहल्ली प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी १० जानेवारीला लस घेऊन गेले होते. ती लस सालहल्ली प्राथमिक आरोग्य केंद्रात ठेवणे गरजेचे होते. मात्र, सदर लस आपणाकडे ठेऊन घेऊन ११ आणि १२ तारखेला मुलांना लस टोचण्यात आली. सदर लसी किल्ला तोरगल गावातील एका हॉटेलमधील फ्रीजमध्ये ठेवण्यात आल्या होत्या.

vaccine
बंद घरातून केली होती चोरी; 'त्या' तिघांना ४८ तासाच्या आत अटक

त्यामुळे फ्रीजमध्ये लसीची कोल्डचेन व्यवस्थित मेंटेन राहिली नाही. ११ तारखेला रामदुर्ग तालुक्यातील मल्लापूर गावात लसीकरण करण्यात आले. त्यामुळे त्या गावातील दीड वर्षाचा चेतन पुजारीचा १२ तारखेला मृत्यू झाला. १२ तारखेला बोचबाळ गावातील २१ लस देण्यात आली. त्यावेळी चार मुलांना, ताप, उलटी जुलाब सुरू झाला. त्यापैकी पवित्रा हुलगुरला १३ तारखेला रुग्णालयाकडे नेत असताना वाटेतच मृत्यू झाला.

तर शनिवारी मधू कुरगुंदि याचा जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. तर अन्य दोघांवर उपचार सुरू आहेत. सालहल्ली प्राथमिक आरोग्य केंद्रातील परिचारिका (नर्स) सलीमा महात आणि फार्मासिस्ट जयराज कुंभार यांनी हलगर्जीपणा केल्याचे दिसून येत आहे. सोमवार (ता.१७) जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना प्राथमिक अहवाल सादर करण्यात आला आहे. हलगर्जीपणा केलेल्या कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. लस कोल्ड स्टोरेज नियमावलीचे उल्लंघन झाल्याचे पुढे आले आहे. असे डॉ. ईश्वर गडाद यांनी स्पष्ट केले.

vaccine
पुणे : सोसायटीच्या पहारेकराचाच मोबाईल चोरांनी पळवला

नर्स आणि फार्मासिस्ट निलंबित

कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याने तीन बालकांचा बळी गेल्याचा ठपका ठेवत सालहल्ली प्राथमिक आरोग्य केंद्रातील नर्स सलीमा महात आणि नर्स जयराम कुंभार यांना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत मुन्याळ यांनी सोमवार (ता.१७) निलंबित केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Koyna Dam additional water demand for Sangli
Sangli District Bank Election Strategy
Woman Allegedly Extorted of ₹17 Lakh
Gopichand Padalkar sangli jilha bank
Marathi News Esakal
www.esakal.com