हेल्पिंग हॅंड्‌स, अन्‌ अंधश्रद्धेवर प्रहार!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 डिसेंबर 2016

कोल्हापूर - महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक संचालनालयातर्फे येथे सुरू असलेल्या चौदाव्या राज्यस्तरीय बाल नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीच्या माध्यमातून छोट्या उस्तादांचा नाट्यजल्लोष अनुभवायला मिळत आहे.

स्पर्धेच्या आजच्या तिसऱ्या दिवशी एकूण चार बालनाट्ये सादर झाली. त्यातून शाळेतील गरजू मित्र-मैत्रिणींना मदतीचा हात द्या, मोलाच्या क्षणांचे व्यवस्थापन करा आणि शालेय वयातच अंधश्रद्धा जाणून घेताना त्याचा समूळ नाश करा, असा सल्ला त्यांनी दिला. राजर्षी शाहू स्मारक भवनात गुरुवार (ता.१५) पर्यंत ही फेरी रंगणार असून, एकूण ३६ प्रयोग सादर होणार आहेत. 

आज ‘त्या चौघी’ (अण्णा भाऊ साठे स्कूल, आजरा), ‘म्या बी शंकर हाय’ (बाबा वर्दम थिएटर, कुडाळ), ‘खेळता खेळता’ (बहुरूपी कलामंच, कोल्हापूर), ‘मोल क्षणांचे’ (बापूसाहेब खवाटे हायस्कूल, अंकली) हे चार नाट्यप्रयोग सादर झाले. दरम्यान, स्पर्धेतील सर्वाधिक प्रयोग उद्या (ता. १३) सादर होणार असून, सकाळी दहा ते रात्री आठपर्यंत स्पर्धा सुरू राहील. अधिकाधिक शालेय विद्यार्थ्यांसह पालकांनी स्पर्धेतील प्रयोग आवर्जून व्हावेत, असे आवाहन संयोजकांनी केले आहे. 

आजची बालनाट्ये

सकाळी दहा वाजता - ‘धाकटी बहीण’ (सिटी हायस्कूल, सांगली)   सव्वाअकरा वाजता - ‘सिंहगडला जेव्हा जाग येते’ (डॉ. बापट शिक्षण मंदिर, सांगली)

दुपारी साडेबारा वाजता - ‘पाणी रे पाणी’ (ग्रीन व्हॅली स्कूल, पेठवडगाव)   पावणेदोन वाजता - ‘रंग सावल्यांचे’ (गोसालिया हायस्कूल, माधवनगर)   दुपारी तीन वाजता - ‘पाहुणी’ (पुरोहित कन्या प्रशाला, सांगली)

सव्वाचार वाजता - ‘नवे गोकुळ’ (मोहिनी बर्वे शाळा, सांगली) 
सायंकाळी साडेपाच वाजता - ‘शोध सत्याचा’ (कोकण कला अकादमी, लांजा) पावणेसात वाजता - ‘थेंबाचे टपाल’ (थोरात अकादमी, सांगली)

Web Title: child drama competition