अंगणवाडीला इमारत नसल्याने चिमुकल्यांची अडचण

ANGANWADI
ANGANWADI

ब्रह्मपुरी (सोलापूर) : चोखामेळानगर (ता. मंगळवेढा) येथील ग्रामपंचायतीच्या हद्दीतील मित्रनगर भागात  अंगणवाडीला इमारतच नसल्यामुळे अक्षरशः ही अंगणवाडी रस्त्याच्या कडेला झाड़ा झुडपात उघड्यावर भरत असल्यामुळे चिमुकल्यांना ऊन, वारा, पाऊस यांच्याशी सामना करावा लागतो आहे. गेली दोन महिने ही परिस्थिती सुरू असल्याने पालक वर्गातून प्रशासनाच्या विरोधात संतापजनक प्रतिक्रिया उमटत आहेत. 

चोखामेळानगर ग्रामपंचायतीच्या हद्दीत मित्रनगर ता.23 मार्च 2011 पासून अंगणवाडी सुरू असून या अंगणवाडीमध्ये जवळपास 20 मुले आहेत. गेली 7 वर्षे या अंगणवाडीला शासनाची इमारत न मिळाल्यामुळे अंगणवाडीतील मुलांची सुरक्षिततेची ऐशीतैशी सुरू आहे. यापूर्वी ही अंगणवाडी एका खाजगी जागेत भरत होती. सदर जागेत अंगणवाडी भरविण्यास मनाई केल्याने जून महिन्यापासून ही अंगणवाडी अक्षरशः रस्त्याच्या कडेला एका वृक्षाखाली भरत आहे.

मित्रनगर हा भाग मंगळवेढा शहरालगत असून तो ग्रामपंचायतीच्या हद्दीत येतो. शहराजवळ अंगणवाडीची ही परिस्थिती असेल तर अन्य ठिकाणी काय परिस्थिती असेल असा सवाल पालक वर्गातून मत व्यक्त केले जात आहे. त्याचबरोबर मारापूर रोडवरील दत्तू वस्ती वर भरत असलेल्या अंगणवाडीही उघड्यावरच भरत असल्याची तक्रार आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असून अधूनमधून पावसाच्या सरी कोसळतात. पावसामध्ये लहान मुले भिजून आजारी पडल्यानंतर याला जबाबदार कोण? असा सवाल पालकांचा आहे. भारत देश 'डिजीटल इंडिया'ची स्वप्ने पाहत असताना दुसरीकडे विद्यार्थ्यांना उघड्यावर बसवून शिकण्याची वेळ आली आहे.

सध्या बालविकास प्रकल्प अधिकारी नसल्याने कार्यालयाचे नियंत्रण हे गटविकास अधिकारी आर.आर.जाधव यांच्याकडे आहे. यांच्या कारकिर्दीत मुलांना निवारा मिळत नसल्याने मुलांचे दुर्देव म्हणण्याची वेळ आली आहे. दरम्यान, प्रिती पुजारी, कल्याण खराडे, भाग्यश्री कदम, उज्वला नाईकवाडी, सुवर्णा लोकरे, जयवंत शेख, परविण शेख, मिरामंत्री या महिला मातांनी अंगणवाडी उघड्यावर भरत असल्याने संताप व्यक्त केला. अंगणवाडीतील मुलांना येणारा खाऊ ठेवण्यासाठीही सुरक्षित जागा नसल्यामुळे हा खाऊ कुठे ठेवायचा? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

"अंगणवाडीस मंजुरी आहे मात्र ती भरविण्यास ग्रामपंचायतीची जागा उपलब्ध  नाही. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. इमारत नसल्यामुळे आमची लहान मुले पावसात भिजून आजारी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. ग्रामपंचायतीने तात्काळ जागा उपलब्ध करून अंगणवाडीस देवून मुलांची सुरक्षितता जपावी."
- प्रिती पुजारी, माता पालक, चोखामेळानगर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com