बालविवाह प्रकरणात नवरदेवासह वडिलांविरुध्द गुन्हा दाखल

हुकूम मुलाणी
सोमवार, 31 डिसेंबर 2018

मंगळवेढा  :  तालुक्यातील पडोळकरवाडी येथे बालविवाह केल्याप्रकरणी दोन नवरदेवासह मुला-मुलीच्या वडीलांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. कारवाईसाठी आलेल्या पोलिसांना पाहताच मंडपवाला, भटजी, बँडपथक, आचारी यांनी लग्नमंडपातून काढता पाय घेतला.      

मंगळवेढा  :  तालुक्यातील पडोळकरवाडी येथे बालविवाह केल्याप्रकरणी दोन नवरदेवासह मुला-मुलीच्या वडीलांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. कारवाईसाठी आलेल्या पोलिसांना पाहताच मंडपवाला, भटजी, बँडपथक, आचारी यांनी लग्नमंडपातून काढता पाय घेतला.      

पोलिसांमुळे वधू-वरांना शुभमंगल सावधान होण्यापूर्वीच माघार घ्यावी लागली़. दरम्यान,या घटनेची खबर देणाऱ्या नातेवाईकांचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु खबर देणाऱ्याचे नाव मात्र गुलदस्त्यातच राहिले.

याप्रकरणी सोमनाथ नामदेव गोरड (वय.२२),नामदेव सोमनाथ गोरड, नवनाथ नामदेव गोरड (वय.२१),पांडुरंग यशवंत कोळेकर सर्व जण पडोळकरवाडी, बिराप्पा शामराव वाघमोडे (रा.लोणार) यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला. वराच्या घरासमोर दोन मुलाचा व दोन अल्पवयीन मुलींसोबत विवाह होता. दोन्ही वरांचे वडील नामदेव गोरड व दोन्ही अल्पवयीन मुलींचे वडील बिराप्पा वाघमोडे व पांडुरंग कोळेकर यांनी लावून दिला. म्हणून उपनिरीक्षक दत्तात्रय पुजारी यांनी फिर्याद दिली.

या घटनेचा अधिक तपास पोलीस फौजदार जमादार हे करीत आहेत. ही कारवाई पोलिस निरीक्षक अनिल गाडे यांच्या  मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दत्तात्रय पुजारी, विकास क्षीरसागर, मनोज कुंभार, महिला पोलिस कॉन्स्टेबल मोनिका वाघे यांनी केली. आरोपीविरुद्ध बालविवाह प्रतिबंध अधिनियम कलम 9 व 10 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: In the child marriage case, an FIR has been filed against father and groom