असुरक्षितता, गरिबीमुळेच कोल्हापूर जिल्ह्यात बाल विवाह

लुमाकांत नलवडे
गुरुवार, 27 डिसेंबर 2018

कोल्हापूर - असुरक्षितता, गरिबीमुळेच जिल्ह्यात बाल विवाह होत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. गेल्या पंधरा दिवसांत तीन बाल विवाह रोखण्यात आले. पैकी एक विवाह झाला की नाही याची चौकशी सुरू आहे. शहरात सख्ख्या बहिणींचा सुरू असलेला बाल विवाह रोखण्यात आला आहे. 

वर्षभरात जिल्ह्यात तब्बल ३५ बाल विवाह रोखल्याची आकडेवारी पुढे आली आहे. यावरून मुलींच्या असुरक्षिततेचा मुद्या पुन्हा पुन्हा विचार करायला लावणारा आहे. ‘लेक वाचवा, लेक वाढवा’ अभियानावर लाखो रुपये खर्च होत आहेत. गल्ली ते दिल्ली पर्यंत जनजागृतीचे प्रयत्न सुरू आहेत. 

देशाच्या अजेंड्यावरील हा एक महत्त्वाचा विषय मानला जात आहे;  मात्र ती किती सुरक्षित आहे, याकडे दुर्लक्ष होत असल्याची धक्कादायक माहिती कोल्हापूर जिल्ह्यात पुढे आली आहे. जिल्ह्यात ‘चाईल्ड लाईन’ ही संस्था लहान मुलांच्या कल्याणासाठी काम करते. या संस्थेकडे अनेक तक्रारी येतात. पैकी बाल विवाह विषयक तक्रारी होत्या. यापैकी बहुतांश बालविवाह रोखण्यात त्यांना यश आले आहे. वर्षभरात जिल्ह्यात ३५ बाल विवाह रोखल्याचे ‘चाईल्ड लाईन’ संस्थेने सांगितले.

कोल्हापुरात १२ डिसेंबर २०१२ ला बाल विवाह झाल्याचा दावा एका शिष्टमंडळाने केला आहे. त्याच्या चौकशीचे काम पोलिसांकडे आले आहे. बाल कल्याण समितीने हे आदेश पोलिसांना दिले आहेत. विवाह रोखल्यानंतरही तो झाल्याची बाब संबंधित शिष्टमंडळाने बाल कल्याण समितीच्या निदर्शनास आणली आहे. इंटरनेटच्या प्रगत युगातही बाल विवाह होत असल्याचे वृत्त ‘सकाळ’ने नुकतेच प्रसिद्ध केले होते. त्याची चौकशी सुरू झाली आहे. याला पोलिस निरीक्षक वसंत बाबर यांनी दुजोरा दिला आहे.

संबंधित मुलींना बाल कल्याण समितीसमोर हजर केल्याचेही त्यांनी सांगितले. बाल विवाहाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याची बाब आता अधोरेखित होत आहे. पंधरा दिवसांत तीन अल्पवयीन मुलींचे बाल विवाह रोखले जात असतील, तर नक्कीच ही धोक्‍याची घंटा असल्याचे स्पष्ट होते. अठरा वर्षांखालील मुलीचा आणि २१ वर्षाखालील मुलाचा विवाह करणे कायद्याने गुन्हा आहे. हे माहीत असतानाही असे विवाह होत असल्याचे या घटनांवरून स्पष्ट होत आहे. इतर जिल्ह्यांतही सक्षम यंत्रणा उभी केल्यास तेथील वस्तूस्थिती पुढे येऊ शकते. समाजात पुन्हा बाल विवाह होत असल्याची कारणेही सुद्धा धक्कादायक आहेत. 

वास्तव बदलण्यासाठी प्रयत्नशील
जिल्ह्यातील ३५ बाल विवाह रोखण्यात आम्ही पुढाकार घेतला आहे. बाल कल्याण समितीकडे संबंधितांना हजर केले आहे. विवाह रोखल्यानंतर घेतलेल्या माहितीत मुली असुरक्षित असल्यामुळे, गरीब असल्यामुळे, त्यांना इतरांपासून धोका असल्यामुळे बाल विवाह लावले जात असल्याची माहिती पुढे आली आहे. हे वास्तव बदलण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असे चाईल्ड लाईन संस्थेच्या समन्वयक अनुजा खुरंदळ यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

सख्ख्या बहिणींचे बाल विवाह रोखले
बाल विवाह होत असल्याचे वृत्त ‘सकाळ’ने नुकतेच प्रसिद्ध केले होते. त्याची चौकशी सुरू असतानाच आज कोल्हापूर शहरात सख्ख्या बहिणींचा बाल विवाह रोखल्याची माहिती पुढे आली आहे.

Web Title: Child marriage in Kolhapur district due to insecurity and poverty