सुरक्षा रक्षकाने मुलीला दाखवले खाऊचे आमिष! अन्‌..

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 जानेवारी 2020

हा प्रकार शेजारच्यांनी पाहिला. त्यावेळी तेथे जमलेल्या लोकांनी त्या अल्पवयीन मुलीला विश्वासात घेऊन विचारणा केली. आरोपी धनसिंग जाधव याने अश्‍लील चाळे केल्याचे मुलीने सर्वांसमोर सांगितले.

सोलापूर : अल्पवयीन मुलीला खाऊचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली. या घटनेतील आरोपी हा सुरक्षा रक्षक आहे. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांना त्याला मारहाण केली. नागरिकांच्या तावडीतून सुटल्यानंतर तो पळून गेला आहे. 

हेही वाचा : माहिती आहे का? 'मिडल ईस्ट'ला जाताहेत सोलापूरचे मासे!

खासगी सुरक्षा रक्षक
या प्रकरणात आरोपी धनसिंग जाधव (वय 65, सोलापूर) याच्यावर बाललैंगिक अत्याचार कायद्यानुसार विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो खासगी सुरक्षा रक्षक म्हणून कामाला आहे. ही घटना शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडली. विजापूर नाका पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन मुलीला 65 वर्षाच्या जाधव याने खाऊचे आमिष दाखवले. तिला बाजूला नेऊन तिच्यासोबत अश्‍लील चाळे केले.
 

हेही वाचा : रेल्वे रुळाजवळ सापडला स्वंयसेवकाचा मृतदेह

मुलीने सर्वांसमोर सांगितले
हा प्रकार शेजारच्यांनी पाहिला. त्यावेळी तेथे जमलेल्या लोकांनी त्या अल्पवयीन मुलीला विश्वासात घेऊन विचारणा केली. आरोपी धनसिंग जाधव याने अश्‍लील चाळे केल्याचे मुलीने सर्वांसमोर सांगितले. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांना त्याला मारहाण केली. नागरिकांच्या तावडीतून सुटल्यानंतर तो पळून गेला आहे. याप्रकरणी विजापूर नाका पोलिस ठाण्यात शुक्रवारी रात्री उशिराने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी धनसिंग जाधव याचा शोध सुरू असल्याचे विजापूर नाका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Child sexual abuse at solapur