नदीपात्रात पोहायला जाताय, सावधान!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 एप्रिल 2017

पाटण - कोयना नदीवर पोहायला गेल्यानंतर बुडून मृत्यू झालेल्या दोन घटना दोन महिन्यांच्या कालावधीत घडल्या. उन्हाळी सुटी सुरू झाली असून, पाटण तालुक्‍यात लहान मुले सुट्टीनिमित्त येतात. नदीवर पोहायला जाणाऱ्यांची संख्याही जास्त आहे. कुटुंबाने अथवा मुलांच्या नातेवाईकांनी कोयना नदीवर पोहायला जाणाऱ्या मुलांबाबत दक्ष राहण्याची गरज आहे.

कोयना नदीकाठावर दोन महिन्यांत घडलेल्या दोन घटना हा सावधानता न बाळगल्याने घडलेल्या आहेत. काही क्षणाचा आनंद जिवावर बेतला आहे. कोयना विभागातील हेळवाक पुलानजीक कोयना नदीत २५ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीचा कार्यक्रम झाला. त्यानंतर मित्रासोबत पोहायला गेलेल्या सौरभ संतोष चव्हाण या १३ वर्षांच्या मुलाचा बुडून मृत्यू झाला. या घटनेस दोन महिने पूर्ण होण्याअगोदर १४ एप्रिल रोजी २३ वर्षांचा कराटे येथील युवक विशाल बबन सूर्यवंशी गुंजाळी येथे यात्रेनिमित्त गेला होता. त्या वेळी मित्रांसोबत पोहायला गेला असता कोयना नदीत बुडून त्याचा मृत्यू झाला. दोन्हीही घटनेत मित्रांसोबत पोहायला गेल्यानंतर या घटना घडल्या आहेत. उन्हाळ्याची सुटी व यात्रांचा हंगामामुळे तालुक्‍याच्या बाहेरील चाकरमान्यांची मुले, नातेवाईकांची मुले पाहुणी म्हणून आली आहेत. मुले नदीवर आंघोळ व पोहण्यासाठी जात असतील, तर नातेवाईकांनी दक्षता घेणे गरजेचे आहे.

पोहण्याचा मोह टाळण्याची गरज
कोयना नदीचे पात्र काही ठिकाणी संथ, तर काही ठिकाणी वेगात वाहणारे आहे. काही ठिकाणी नदीपात्रात दिसून न येणाऱ्या झाडांच्या बुंध्यामुळे किंवा खडकामुळे पाण्याचे भोवरे निर्माण झाले आहेत. या भोवऱ्यात पट्टीचा पोहणारा गेला, तरी धोका निर्माण होतो. त्यामुळे माहिती असणाऱ्यांनी अशा ठिकाणच्या नदीपात्रात जाण्याचा मोह टाळण्यासाठी दक्ष राहणे गरजेचे आहे.

Web Title: The children need to stay alert on the river for swimming

टॅग्स