esakal | चर्चाच चर्चा; पुस्तकांच्या गावातील या गुढीचीच चर्चा
sakal

बोलून बातमी शोधा

चर्चाच चर्चा; पुस्तकांच्या गावातील या गुढीचीच चर्चा

गुढीपाडव्या निमित्त पारंपरिक पद्धतीने शहरांमध्ये तसेच गावा गावांमध्ये गुढ्या उभारल्या आहेत. देशहितासाठी आरोग्यदायी सशक्त संकल्पानेतून अनेकांनी गुढ्या उभारल्या आहेत.

चर्चाच चर्चा; पुस्तकांच्या गावातील या गुढीचीच चर्चा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मेढा, भिलार (जि. सातारा) : कोरोना व्हायरसच्या मुक्तीच्या संकल्पाने मराठी नववर्षाचे स्वागत करूया ,यावर्षीचा गुढीपाडवा, घरात राहून साजरा करूया. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळून आरोग्याची काळजी घेऊ याच गुढीपाडव्याच्या सर्वांना आरोग्यदायी हार्दिक शुभेच्छा असे एकमेकांना सोशल मिडीयावरून संदेश दिले जात आहेत. कोरोनाच्या धास्तीने पाडव्याला राम राम करून नमस्कार करणारी मंडळी आता लांब लांब (काळजी घेत) राहताना पाहायला मिळत आहेत. ग्रामीण भागात कमालीच्या शांतता असली तरी घराघरात वेगळ्याच आनंदात दारामध्ये रांगोळी काढून देशहिताच्या नवसंकल्पाच्या, सशक्त आरोग्याच्या गुढया उभारल्या गेल्या आहेत. 

गुढीला वंदन करून या कोरोनाच्या संकटातून माझा गांव, तालुका, जिल्हा, राज्य, देश अन्‌ जग बाहेर पडू दे अश्‍या प्रार्थना करताना अनेकजण पाहायाला मिळत आहेत. राज्यातील गावांमध्येही लॉक डाऊन झाल्याने सातारा जिल्ह्यात देखील कमालीची शांतता पाहायाला मिळत आहे. गाव गावांमध्येही तेरी भी चूप मेरी भी चूप , प्रत्येक जण आपपल्या घरात आणि अंगणात सुरक्षित अंतर ठेवून राहत आहे. त्यामुळे गावांमध्ये कमालीचा सन्नाटा पाहायला मिळत आहे. गावातील विशेष करून मजूरी करणारा वर्ग, तसेच पारंपारीक व्यवसाय करणारे लोक तोंडावर बोट आणि हातावर घडी मारून गप्प बसले आहेत. शेतकरी वर्ग म्हणत आहे, गहू काढणीला आलाय, ज्वारी काटायला आलीय काय करायचं समजंत नाही. सगळीच म्हणता येत घरात बसा घरात बसा पिक काय वाया घालवचयं डोकंच चालना. आता करायचं तरी काय ?

दरम्यान असे असतानाच गुढीपाडव्या निमित्त पारंपरिक पद्धतीने शहरांमध्ये तसेच गावा गावांमध्ये गुढ्या उभारल्या आहेत. देशहितासाठी आरोग्यदायी सशक्त संकल्पानेतून अनेकांनी गुढ्या उभारल्या आहेत. भिलार या गावातील नितीन भिलारे यांच्या कुटुंबियांनी काेराेनाच्या पार्श्वभुमीवर उभारलेले गुढीतून आराेग्यदायी संदेश देण्यात आला आहे. यामध्ये प्रशासनास सहकार्य करा. घरा बाहेर पडू नका. नाका ताेंडावर रुमाल बांधा. हात स्वच्छ साबणाने धुवा याचा समावेश आहे. 

मालक असावा तर असा ...त्यांचा गुढीपाडवा केला गाेड !

#WeVsVirus : ब्राॅडबॅंड कनेक्शनसाठी आम्हांला संपर्क साधा : बीएसएनएल

आई जाण्याचे दुःख बाजूला ठेऊन त्यांनी बजावले कर्तव्य